पंढरपूर शहरासह 10 किलोमीटर पर्यंत संचार बंदी लागू करण्याचा जिल्हाधिकार्‍यांना प्रस्ताव : अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे

पंढरपूर शहरासह 10 किलोमीटर पर्यंत संचार बंदी लागू करण्याचा जिल्हाधिकार्‍यांना प्रस्ताव : अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे
पंढरपूर : प्रतिनिधी
कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी पंढरीची आषाढी यात्रा रद्द करण्यात आली आहे.  दि. 29 जून ते 2 जुलैपर्यंत पंढरपूर शहरासह 10 किलोमीटर परिसरातील गावांमध्ये संचार बंदी लागू करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला आहे. तरी भाविकांनी यंदा आषाढी यात्रेसाठी  पंढरी नगरीत येवू नये असे आवाहन अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी केले आहे.
शहर पोलीस स्टेशन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे बोलत होते. यावेळी  उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, पो. नि. अरूण पवार आदी उपस्थित होते.
सध्या सोलापूर शहरासह ग्रामीण भागात कोरोना झपाट्याने वाढत आहे. कोरोना रोगाचा संसर्ग वाढू नये यासाठी पंढरपूरात भरणारी मुख्य यात्रा आषाढी वारीही शासनाने रद्द केले आहे. 1 जुलै रोजी होणार आषाढी एकादशी असल्यामुळे पंढरपूर शहरासह आसपासच्या 10 किलोमीटर परिसरात संचार बंदी करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचेकडे पाठविण्यात आला आहे. आषाढी यात्रेसाठी 1500 पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात आले आहे. तसेच पंढरपूर शहराच्या सिमेवरही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. लॉक डाऊनमुळे 17 मार्च ते 30 जून दरम्यान श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वारीकाळात ही श्री विठ्ठल मंदिर बंदच राहणार आहे. 

20 thoughts on “पंढरपूर शहरासह 10 किलोमीटर पर्यंत संचार बंदी लागू करण्याचा जिल्हाधिकार्‍यांना प्रस्ताव : अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!