कौठाळी येथे खेळ पैठणीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न

कौठाळी येथे खेळ पैठणीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न

(गप्पा, गाणी, प्रश्नमंजुषा सह हळदी-कुंकू कार्यक्रमास जोरदार प्रतिसाद)
(अभिजीत पाटीलांची विधानसभेची जोरदार तयारी)
(विठ्ठल कारखान्याला अधिक भाव दिल्याने महिला भगिनींमध्ये आनंदाचे वातावरण महिलांनी दिल्या प्रतिक्रिया)

पंढरपूर दि. २२ :

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत धनंजय पाटील यांच्या संकल्पनेतून विठ्ठल प्रतिष्ठान,यांचे वतीने सुप्रसिध्द निवेदिका मोनिका जाजु यांच्या उत्कृष्ट संयोजनातून दैनंदिन जीवनात व्यस्त असलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा हेतु सफल झाला. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांनाही आनंदाचे क्षण वेचता यावेत या अनुषंगाने हा कार्यक्रम कौठाळी, ता. पंढरपूर येथे आयोजित केलेला होता. या कार्यक्रमास कौठाळी व परिसरामधील शेकडो माता-भगिनींनी उस्फुर्त प्रतिसाद देत खेळांमध्ये सहभाग नोंदविला.

यावेळी चेअरमन श्री अभिजीत पाटील यांनी कार्यक्रमादरम्यान महिलांच्या चेहऱ्यावरील हास्य मनाला समाधान देणारे होते अशा भावना व्यक्त करून महिलांना सुखी व आनंदी जीवनाचे मुद्दे पटवून देऊन सदर कार्यक्रमामध्ये विजयी झालेल्या महिलांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांना पारितोषिकांचे वाटप केले. तसेच प्रथमच सदरचा कार्यक्रम ग्रामीण भागामध्ये आयोजित करून महिलांमध्ये उत्साहाचे वातावर निर्माण केल्याबद्दल चेअरमन श्री अभिजीत पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक कालिदास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे अध्यक्ष अॅड. मोहन पाटील, विठ्ठल पाटील, चंद्रभागा साखर कारखान्याचे माजी संचालक बिभिषण पवार, विठ्ठलचे संचालक समाधान गाजरे, गणेश ननवरे, बाळासाहेब हाके, नवनाथ नाईकनवरे, मा.उपसरपंच नामदेव लेंडवे, महादेव इंगळे, सागर गोडसे, भैय्या पाटील, बाळासाहेब नागटिळक, बाळु इंगळे, शिवाजी नागटिळक, धनंजय भुईटे, सुखदेव नागटिळक, समाधान नागटिळक, तानाजी धुमाळ, बाळासाहेब धुमाळ यांच्यासह अभिजीत पाटील यांच्या मातोश्री जयश्री पाटील, सुमित्रा पाटील, रश्मी पाटील परिवारांसह पंचक्रोशीतील अनेक महिला माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या