ईश्वरवठार ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांचा श्रमपरिहार समाजसेवक संजयबाबा ननवरे यांच्या फार्म हाऊसवर रंगला सोहळा

ईश्वरवठार ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांचा श्रमपरिहार

समाजसेवक संजयबाबा ननवरे यांच्या फार्म हाऊसवर रंगला सोहळा


पंढरपूरपासून नजीकच असणारे ईश्वर वठार गाव,
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा नावारूपाला आले.
सुमारे ३५ वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावत, याठिकाणी नवीन

सदस्य मंडळ निवडून आले. या सदस्यांचा सन्मान आणि श्रमपरिहार समाजसेवक संजयबाबा ननवरे यांनी केला. ईश्वर वठार येथे ननवरे यांचे
फार्महाऊस आहे. या ठिकाणी गुरुवारी रात्री या सदस्य मंडळास आमंत्रित करण्यात आले. परिवर्तनास कारणीभूत असणारे सरपंच नारायण देशमुख आणि त्यांचे सदस्य मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांना भोजन देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.


ईश्वर वठार गावातील लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकला आहे, हा विश्वास काम करून सार्थकी लावावा, असे मत समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी व्यक्त केले.

सत्ता नसताना आम्ही काम करून दाखवले आहे. आता सत्तेवर आलो आहोत. प्रत्येकास दिलेले वचन नक्कीच पूर्ण करून दाखवू, असा विश्वास नूतन सरपंच नारायण देशमुख यांनी व्यक्त केला. समाजसेवक संजय ननवरे यांनी केलेल्या सन्मानाबद्दल त्यांचे आभार मानले. याप्रसंगी श्री संत बाळूमामा परिवर्तन आघाडीचे भाजपचे नेते माऊली भाऊ हळणवर विजय आण्णा मेटकरी, बाळासाहेब खांडेकर, पंकज देवकते, माऊली गुंडगे, भारत पांढरे, महाळाप्पा खांडेकर, महेश सरवदे, मारूती सरवदे, अजय देशमुख, राम तरंगे, सदाशिव मेटकरी, सुरेश खरात, सुनिल तरंगे, प्रशांत लवटे, बापू बोरकर ,

प्रल्हाद आप्पा तरंगे, विक्रम माने, अर्जुन टोमपे, आकाश बोरकर, निखिल सप्ताळ, सूरज ननवरे, राहुल काळुखे, अभिषेक ननवरे, विकास गायकवाड, गणेश गायकवाड, ओम ननवरे, गुलाब खांडेकर, अशोक तरंगे, बाळासाहेब ठवरे, गौतम सरवदे, स्वप्नील शिंदे, प्रकाश गायकवाड, गणेश काळूखे तसेच इतर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

26 thoughts on “ईश्वरवठार ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांचा श्रमपरिहार समाजसेवक संजयबाबा ननवरे यांच्या फार्म हाऊसवर रंगला सोहळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या