पंढरपूर तालुका व ग्रामीण पोलीसांची अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई मुद्देमाल हस्तगत.

पंढरपूर तालुका व ग्रामीण पोलीसांची अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई मुद्देमाल हस्तगत.

पंढरपूर प्रतिनिधी. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यांचा दिनांक २ डिसेंबर २०२३ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय मुजावर यांनी पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहेत.‌ पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यांला खमक्या अधिकारी मिळाला असल्याची ग्रामीण च्या परिसरांतील नागरिकांतून चर्चा आहे. तसेच त्यांच्या धडक कारवाईमुळे अवैधरित्या धंदे करणा-या व्यवसायिकांचे तसेच अवैधरित्या विना परवाना वाळू माफियांचे देखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय मुजावर यांच्यामुळे चांगलेच धांबे दणाणले असुनही पंढरपूर तालुका व ग्रामीण पोलिसांची वाळू माफियांवर कारवाईचा बडगा सुरुच आहे, यामध्ये शनिवारी मध्यरात्री दोन पिकप गाड्या जप्त दोन ब्रास वाळू जप्त असा एकूण जवळपास दहा लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीण चे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय मुजावर ए एस आय तोंडले पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील मोरे गजानन माळी पोलीस कॉन्स्टेबल राहुल जगताप पोलीस कॉन्स्टेबल नलावडे यांच्यासह आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.

ताज्या बातम्या