पंढरपूर अवैध वाळू वाहतूकीवर महसूल व पोलिस प्रशासनाची कारवाई १८ लाकडी होड्या केल्या नष्ट

पंढरपूर अवैध वाळू वाहतूकीवर महसूल व पोलिस प्रशासनाची कारवाई १८ लाकडी होड्या केल्या नष्ट

-तहसिलदार- सचिन लंगुटे

१८ लाकडी होड्या केल्या नष्ट

पंढरपूर दि.२४:- अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकाने भीमा नदीपात्रात अवैध वाळू वाहतूकीसाठी वापरण्यात येणाऱ्या १८ लाकडी होड्या जेसीबी व कटरच्या साह्याने पूर्णपणे नष्ट करण्यात आल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली.

पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार सचिन लंगुटे यांनी विविध पथकांची नेमणूक केली आहे. दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी पंढरपूर शहरा नजीकच्या चंद्रभागा नदी पात्रामध्ये पंढरपूर – इसबावी दरम्यान असणाऱ्या ओढ्यामधील अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ८ लाकडी होड्या जेसीबी च्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या. तसेच शिरढोण – इसबावी दरम्यान असणाऱ्या ओढ्यामधील अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या १० लाकडी होड्या कट्टर च्या साह्याने कट करून पूर्णपणे नष्ट करण्यात आल्या.

या कारवाईमध्ये मंडळ अधिकारी विजय शिवशरण, राजेंद्र वाघमारे , रिगन चव्हाण.ग्राम महसूल अधिकारी अमर पाटील,प्रमोद खंडागळे , महेशकुमार सावंत, गणेश पिसे, संजय खंडागळे रविकिरण लोखंडे , पि पि कोईगडे ,पीयूष भोसले, दिगंबर डोईफोडे व पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

 

4 thoughts on “पंढरपूर अवैध वाळू वाहतूकीवर महसूल व पोलिस प्रशासनाची कारवाई १८ लाकडी होड्या केल्या नष्ट

  1. Excellent site. Lots of helpful info here. I am sending it to some pals ans also sharing in delicious. And certainly, thank you in your effort!

  2. Thanks for sharing excellent informations. Your web site is very cool. I am impressed by the details that you’ve on this web site. It reveals how nicely you perceive this subject. Bookmarked this website page, will come back for extra articles. You, my friend, ROCK! I found just the info I already searched everywhere and just couldn’t come across. What a perfect web site.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या