पंढरपूर नगर पालिकेच्या स्वामिंग टँकमध्ये बुडून इसबावीतील तरुणाचा मृत्यू

पंढरपूर नगर पालिकेच्या स्वामिंग टँकमध्ये बुडून इसबावीतील तरुणाचा मृत्यू
पंढरपूर (प्रतिनिधी)_पंढरपूर येथील न पा प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या पद्मावती जलतरण तलावात पोहताना बुडाल्याने एका युवकाचा बुडून मृत्यु झाला आहे.
ही दुर्दैवी घटना शनिवार दि१मार्च रोजी दुपारी साडे तीन वाजता घडली. सध्या दुपारी उन्हाच्या तीव्र झळा वाढल्या असून अनेक युवक जलतरण तलावात पोहण्यासाठी जात आहेत.
न.पा. तलवात पोहताना यशराज विजय माने (वय २१, रा.ईसबावी, पंढरपूर) याचा बुडून मृत्यु झाला असल्याची ही तिसरी घटना असून जीवरक्षक तैनात असतानाही युवक कसा बुडाला? हे कोडेच आहे.
यापूर्वी सुयोग संगीतराव याचा २०१२साली तर एका परप्रांतीय तरुणाचा २०१८साली या जलतरण तलावात पोहताना मृत्यू झाला होता.
याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून हवालदार गजानन पाटील अधिक तपास करीत आहेत.