सांगोल्यात ”मटण भाकरी हॉटेलवर”पडली पोलिसांची धाड,तब्बल 2 कोटी 60 लाखांचा मुद्देमाल जप्त,52 जणांना घेतलं ताब्यात

सांगोल्यात ”मटण भाकरी हॉटेलवर”पडली पोलिसांची धाड,तब्बल 2 कोटी 60 लाखांचा मुद्देमाल जप्त,52 जणांना घेतलं ताब्यात
सांगोला -हॉटेल मटण भाकरीच्या नावाखाली वेगळाच पराक्रम, पोलिसांनी धाड टाकताच पायाखालची जमीन सरकली; सोलापूर जिल्हात खळबळ
राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. सांगोला तालुक्यात एक संतापजनक प्रकार समोर आलेला आहे. हॉटेलच्या नावाखाली जुगाराचा अड्डा सुरु असून पोलिसांनी धाड टाकलीय. या धाडीत तब्बल अडीच कोटीच्या जवळपास मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे सोलापूर जिल्हात खळबळ उडाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामधील सोनंद गावात हॉटेल मटन भाकरीच्या आड जुगार चालत असलेल्या हॉटेलवर पोलिसांनी कारवाई केली आहे.या कारवाईमध्ये 52 पत्त्यांचा डाव खेळत असताना 50 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यामध्ये आत्तापर्यंत सर्वात मोठी रक्कम जवळपास 2 कोटी 68 लाख 72 हजार 150 रुपये मुद्देमाल जप्त केला आहे.सोलापूर जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी केलीय