काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा दिला राजीनामा

काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा दिला राजीनामा
राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावर स्टेटस ठेवल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे.
तर ते नॉट रिचेबल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याच्या चर्चा सुरू आहे. नांदेडमध्ये राजकीय भूकंप झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. जर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडला तर काँग्रेसला मोठा धक्का असणार आहे. तर मोठ्या काँग्रेस नेत्याच्या पक्षप्रवेशाची तयारी भाजप करत असल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत.राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांमध्ये अशोक चव्हाण यांची ओळख आहे. अशोक चव्हाण लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे अशा चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्याचबरोबर अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चाही केली. त्यांच्यामध्ये या भेटीवेळी चर्चा झाली. ते सध्या नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा आहेत.
Awsome article and right to the point. I am not sure if this is really the best place to ask but do you folks have any thoughts on where to hire some professional writers? Thank you 🙂
good post.Never knew this, regards for letting me know.
It’s the best time to make some plans for the longer term and it’s time to be happy. I have learn this publish and if I could I desire to recommend you few fascinating issues or advice. Maybe you can write next articles regarding this article. I want to learn more issues about it!