जाचक त्रासाला कंटाळून लहान मुलासह आईने केली आत्महत्या पती, सासू-सासऱ्याविरुद्ध करकंब पोलीस ठाण्यात 3 विरुद्ध गुन्हा दाखल

जाचक त्रासाला कंटाळून लहान मुलासह आईने केली आत्महत्या
पती, सासू-सासऱ्याविरुद्ध करकंब पोलीस ठाण्यात 3 विरुद्ध गुन्हा दाखल
पंढरपूर:मन सुन्न करणारी घटना समोर येतेय सोलापूर जिल्ह्यातून… पंढरपूर तालुक्यातील देवडे येथील एका विवाहित महिलेने आपल्या नवऱ्याच्या आणि सासू सासऱ्याच्या जाचाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलत अखेर आपल्या सहा वर्षाच्या मुलासह भीमा नदीपात्रात उडी घेत जिवन संपवले आहे…याप्रकरणी मयत विवाहितेचा भाऊ विशाल डुकरे यांच्या तक्रारीवरून पती आणि सासू सासऱ्याविरुद्ध सोलापूर ग्रामीण करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहितेने आपल्या सहा वर्षीय
मुलासह भीमा नदीत उडी मारून
आत्महत्या केल्याची घटना सोमवारी
रात्री ते मंगळवारी मध्यरात्री घडली
आहे. प्रियांका विक्रम नलवडे (वय
३० वर्षे) आणि मुलगा राजवीर (वय ६) अशी मृतांची नावे आहेत. आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून पती
सह सासू आणि सासऱ्यांविरोधात
करकंब पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रियांका विक्रम नलवडे ही विवाहिता आपल्या मुलासह सोमवारी सायंकाळी सात वाजल्या पासून घरातून निघून गेली होती.तिच्या पतीसह नातेवाईकांनी तिचा आसपास शोध घेतला परंतु ती सापडली नाही. पहाटेच्या सुमारास घरापासून एक किलोमिटर अंतरावर भीमा नदीच्या पात्रात दोघांचे मृतदेह आढळून आले. पोलीस पाटलांनी ही खबर करकंब पोलिसांना दिली.दरम्यान, मृत प्रियांकाचा भाऊ विशाल किशोर डुकरे (रा. नळदुर्ग,ता. तुळजापुर, जि. धाराशिव ) याने करकंब पोलीस ठाण्यात विक्रम नलवडे आणि त्याचे वडील व आई यांच्याविरोधात प्रियंका चे भाऊ यांनी जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतली नाही
बहीण प्रियांका आणि भाचा राजवीर यांच्या आत्महत्येस जबाबदार धरून तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीनुसार प्रियांका हिला तिचे पती तसेच सासु-सासरे यांच्याकडुन होणारा जाच तसेच वारंवार होणाऱ्या अपमानामुळे कंटाळून तिने तिचे मुलासोबत आत्महत्या केली
हा मृतदेह संशयत अवस्थेत भीमा नदीच्या काठी वरती पडल्याने घातपात देखील शक्यता वर्तुली जात आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करकंब पोलिसांना करावा लागणार आहे.
आहे. कलम.306.34 अन्वे गुन्हा दाखल आहे.
समाजातील गुंड प्रवृत्ती लोकाविरुद्ध कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.