सुहागरात जेलमध्ये दिवाळी सण सासरवाडीला.!! काय आहे सोलापूर जिल्ह्यातील मजेदार खटला वाचा…

सुहागरात जेलमध्ये दिवाळी सण सासरवाडीला.!! काय आहे सोलापूर जिल्ह्यातील मजेदार खटला वाचा…

सुहागरात जेलमध्ये दिवाळी सण सासरवाडीला.!! काय आहे सोलापूर जिल्ह्यातील मजेदार खटला वाचा…

सोलापूर : प्रेयसीने केलेल्या आरोपामुळे लग्न झाल्यानंतर सुहागरातच जेलमध्ये काढाव्या लागलेल्या माढा तालुक्यातील नवविवाहित तरुणाची जामिनावर मुक्तता झाल्यामुळे त्यास सासुरवाडीला पहिल्या दिवाळी सणाचा मानाचा पाहुणचार घेता आला.

या मजेशीर खटल्याची हकीकत अशी की, शेटफळ कुर्डूवाडी रस्त्यावरील एका गावातील तरुणाचा विवाह झाला. दुसऱ्या दिवशी लग्नाच्या पश्चात विधी चालू असतानाच पोलीसची गाडी घरासमोर येऊन थांबली आणि पोलीस गाडीतून नवरदेवाची वरात पोलीस स्टेशनला गेली.

नवरदेवाला समजेना काय झाले पोलीस स्टेशनमध्ये त्यास समजले की, त्याच गावातील एका तरुणीने त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली की सदर तरुणाचे माझे दोन वर्षापासून प्रेम संबंध होते काल मी बहिणीच्या घरी गेले असताना आरोपी तेथे आला व त्याने माझ्यावर तसले कृत्य केले त्यास अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले

न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आणि नवरदेवास सुहागरात तजेलमध्ये काढावी लागली पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याने ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने यांचे मार्फत बार्शी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. आरोपी विरुद्ध करण्यात आलेले सर्व आरोप असंभवनीय आहेत. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी कोणताही नवरदेव परस्त्रीच्या वस्तीवर जाऊन परस्त्रीवर असले कृत्य करणे शक्य नाही.

आरोपीला या खटल्यात गुंतवण्यात आले आहे असा युक्तिवाद आरोपी पक्षातर्फे न्यायालयात करण्यात आला न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर करून आरोपीची जामीन वर मुक्तता करण्याचे आदेश दिले

या प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. शरद झालटे यांनी काम पाहिले सुहागरात पोलीस कोठडीत काढणाऱ्या नवरदेवास न्यायालयाने दिवाळीच्या सुट्टी सुरू होण्याच्या शेवटच्या दिवशी मुक्तता केल्यामुळे सुहागरात जेलमध्ये काढाव्या लागलेल्या नवरदेवास पहिल्या दिवाळी सणाचा सासरचा मानाचा पाहुणचार घेता आला!

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या