चक्क पंढरपूर नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीवर केले वृक्षारोपन पंढरपूरकर नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराकडं लक्ष द्या! …अन्यथा एक रुपयांचाही कर भरु नका!! – गणेश अंकुशराव

चक्क पंढरपूर नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीवर केले वृक्षारोपन
पंढरपूरकर नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराकडं लक्ष द्या!
…अन्यथा एक रुपयांचाही कर भरु नका!! – गणेश अंकुशराव

पंढरपुर : 9 प्रतिनिधी
चंद्रभागेच्या तीरावर अत्यंत सुबक व रेखीव बांधकाम असणारी पंढरपूर नगरपरिषदेची पुरातन ऐतिहासिक इमारत आज वापराविना धुळखात पडून आहे. या इमारतीवर व आवारात मोठमोठी झाडे,झुडपे वाढल्याने इमारतीला झाडा-झुडपांचा विळखा पडलाय. शासनाच्या वृक्ष लागवढीचा संदेश जपत पंढरपूर नगरपरिषदेच्या अधिकार्‍यांनीच या इमारतीवर अशी मोठमोठी झाडी लावली आहेत की काय? अन् जर हे खरे असेल तर अशा कर्तव्यदक्ष व दुरदृष्टीच्या अधिकार्‍यांचा सत्कारंच करायला हवा! असा उपरोधात्मक प्रश्‍न विचारत महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी या इमारतीवरील सर्व झाडे, झुडपं, वैली काढुन ही इमारत सुशोभित करुन वापरात आणावी अशी मागणी केली आहे.

वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धासाठी मिळणारा दोन-दोन कोटींचा निधी कुठे खर्च होतो?
वास्तवीक पहाता पंढरपूर नगरपरिषदेकडून दर वर्षी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनासाठी कोट्यावधी रुपयांचे टेंडर काढते, हे पैसे कुठे खर्च होतात? याचा हिशोब त्यांनी पंढरपुरकरांना दिलाय का? की कुणालाही त्रास होऊ नये म्हणून या सर्व निधीचा वापर जुन्या नगरपरिषदेच्या इमारतीवर वृक्ष लागवड करण्यासाठी केला जातोय? असे प्रश्‍नही यावेळी गणेश अंकुशराव यांनी उपस्थित केले. आज पंढरपूर शहर व परिसरात नजर टाकली तर कुठेच मोठ मोठी झाडं राहिलेली नाहीत. रस्त्यांच्या कामासाठी मोठमोठी पुरातन वृक्षांची कत्तल केली गेली. त्यानंतर वृक्ष लागवड व संगोपन करण्याचा संकल्प शासनाने केला, यासाठी कोट्यावधींचा निधीही मिळाला परंतु या निधीद्वारे कोणत्याही प्रकारची लक्षवेधी अशी वृक्षलागवड झालेली आढळुन येत नाही.

दरवर्षी नगरपरिषदेकडून अंदाजे दोन कोटी रुपयांचे टेंडर हे वृक्ष लागवडीसाठी निघते, पण या निधीचा योग्य ठिकाणी योग्य वापर होत नाही, ठेकेदार अनं त्यांचे बगलबच्चे यांचे उखळ पांढरे होते. अशा प्रकारचे खुप मोठे पातक पंढरीच्या पांडुरंगाचीही भीती नसलेल्या कांही बांडगुळांकडून वर्षानुवर्षे होत आले आहे, त्यांना वेळीच आवर नाही घातला तर शासनाच्या किती तरी चांगल्या कामासाठीचा निधी असाच लाटला जाईल अन् जनतेच्या हितासाठीची कामं रखडलेलीच दिसतील. आता तरी पंढपुरकरांनी याविरुध्द आवाज उठवायला हवा, एकदिलानं नगरपरिषदेच्या कारभारात काय चालतंय, याकडं लक्ष घालावं अन्यथा एकही रुपयाचा निधी नगरपालिकेच्या कराचा भरु नये. असे आवाहन महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी सर्वसामान्य पंढरपुरकरांना केलंय. लवकरात लवकर चंद्रभागेच्या तीरावरील नगरपरिषेची पुरातन इमारत स्वच्छ करुन तीची डागडुजी करावी अन्यथा तेथील; झाडे तोडून नगरपरिषदेच्या नव्या इमारतीत रचण्यात येतील व तीव्र आंदोलन करण्यात येईल असा गंभीर इशारा गणेश अंकुशराव यांनी दिला आहे. यावेळी गणेश अंकुशराव, वैभव कांबळे, अप्पा करकमकर, गणेश कांबळे, नितीन शिरगुर, उल्केश कोळी, महेश कोळी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या