मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून होणार भाविकांना मोफत अन्नदान

आषाढी वारीत दोन ठिकाणी होणार सलग तीन दिवस वाटप

शिवसेना संपर्क प्रमुख महेश साठे आणि राम रेपाळे यांच्या देखरेखीखाली जय्यत तयारी सुरु

पंढरपूर /प्रतिनिधी

राज्याचे कर्तव्यतत्पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी वारी चांगल्या पद्धतीने पार पाडावी यासाठी मागील वर्षीपासून प्रशासन सतर्क करून दाखविले आहे. केवळ सरकारी खर्च नव्हे तर मुख्यमंत्री शिंदे यांनी भाविकांना भोजन मिळावे यासाठी स्वखर्चातून सलग तीन दिवस मोफत भोजन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मागील वर्षी पाच लाख भाविकांनी एकाच केंद्रावरून लाभ घेतला होता. त्यामुळे यावर्षीही जास्तीत जास्त भाविकांना भोजनाचा लाभ मिळावा यासाठी या आषाढी वारीत दोन ठिकाणी अन्नदान केंद्र उभारण्यात येत आहेत. त्यामधील एक केंद्र चंद्रभागा बसस्थानक पालखी मार्गांवर तर दुसरे गजानन महाराज पिछाडीला भक्त निवास समोर उभारण्यात येत आहे. वरील दोन्ही केंद्राची शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांच्या देखरेखी खाली सुरु असून तयारी जवळपास पूर्ण होत आलेली आहे.
16 जुलै पासून 18जुलै प्रयत्न हे मोफत भोजन वाटप होणार आहे. यामध्ये पाणी बाटली, सरबत बाटली आणि पंच पक्वन्न भोजन देण्यात येणार आहे.

वरील दोन्ही ठिकाणी जी व्यवस्था सुरु आहे. त्याठिकाची पाहणी करण्यासाठी ठाणे महानगरपालिका स्थायी समिती सभापती राम रेपाळे, शिवसेना संपर्क प्रमुख महेश साठे, शिवसेना ठाणे उप शहर प्रमुख जयप्रकाश कोठवणी, ठाणे शाखा प्रमुख रोहित कदम, सोलापूर जिल्हा शिवसेना महिला आघाडी प्रमुख मुबीना मुलांनी,युवती सेना जिल्हा प्रमुख प्रियांका परांडे, महेश ताठे, विक्रम आसबे, प्रमिला कुराडे, शिवानंद कठीमनी, नितीन पवार, आनंद उपाध्ये, कुमार परांडे, शुभम लिमकर, पल्लवी जन्मले, वैशाली काळे,किसन काळे, सिद्धेश्वर शिंदे, किसन काळे, अमोल भोसले, शिवतेज चव्हाण, बाळासाहेब भोसले सुरेश पवार आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या