पंढरपूर गारपीर बाबा मोहरम सोहळा उत्साहात साजरा

गारपीर बाबा मोहरम सोहळा उत्साहात साजरा
हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक समजला जाणारा व गेल्या अनेक वर्षाची परंपरा असणारा पंढरपूर शहरातील जुन्या कोर्टाजवळी भोसले (परीट) घराण्यातील श्री गारपीर बाबा यांचा मोहरम सोहळा उत्साहात पार पडला.
या काळात शुक्रवार 12 जुलै रोजी श्री गारपीर बाबा यांची सवारी बसवण्यात आली होती. १६ जुलै रोजी खतलरात्री ८:०० वा श्री गारपीर बाबांच्या सवारीची महापूजा झाली. रात्री उशीरा आविला खेळ संपन्न झाला. दुसऱ्या दिवशी रा. ८:०० वा मोहरम विसर्जन करण्यात आले. हा सोहळा अतिशय शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरणात पार पडला.या सोहळ्यासाठी सोलापूर, मुंबई,पुणे,सांगली, कोल्हापूर मधून भक्त आले होते.तसेच महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले वारकरी पण सोहळ्यामध्ये सहभागी झाले व श्री गारपीर बाबांच्या सवारीचे दर्शन घेतले.