वसंतराव काळे प्रशालेत राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षकांचा सत्कार संप्पन्न

वसंतराव काळे प्रशालेत राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षकांचा सत्कार संप्पन्न

वसंतराव काळे प्रशाला वाडीकुरोली येथील कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडू स्नेहा लामकाने, ऋतुजा सुरवसे, कोमल पासले यांनी राष्ट्रीय खो- खो स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाकडून खेळताना सुवर्णपदक मिळवल्याबद्दल व महाराष्ट्र खो- खो संघाचे प्रशिक्षक वसंतराव काळे प्रशालेतील सहशिक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र खो- खो संघाने सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. कल्याणराव काळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव मा. बाळासाहेब काळे गुरुजी वसंतराव काळे आय.टी.आय. कॉलेजचे प्राचार्य श्री. संतोष गुळवे रायझिंग स्टार पब्लिक स्कूलच्या प्राचार्या सौ. गीतांजली खाडे पालक अनिल लामकाने, श्री.मारुती सुरवसे श्री.शहाजी पासले, shप्राचार्य एस. आर. कुलकर्णी पर्यवेक्षक एस. एम शेख उपस्थित होते.
झारखंड येथे झालेल्या 14 वर्षाखालील मुलींच्या गटात राष्ट्रीय खो- खो स्पर्धेत कोमल पासले हिने महाराष्ट्र संघाकडून खेळताना सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच गुजरात वडोदरा येथे झालेल्या अस्मिता लीग पश्चिम विभागीय खेलो इंडिया खो- खो स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळताना स्नेहा लामकाने व ऋतुजा सुरवसे यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. झारखंड येथे झालेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र खो-खो संघाचे प्रशिक्षक म्हणून सहशिक्षक अतुल जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी सुवर्णपदक प्राप्त केले.
यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव काळे म्हणाले की ग्रामीण भागातील खेळाडूंच्या अंगी असणाऱ्या गुणवत्तेला योग्य मार्गदर्शन मिळाले तर यश निश्चित मिळते. खेळाडूंनी जिद्द व चिकाटीने सरावातील सातत्य ठेवत यशाला गवस निघालावी असे सांगून पालकांनीही आपल्या मुलांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालक समाधान काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहशिक्षक दिलीप लिंगे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या