बहिणींच्या आनंद हाच आशीर्वाद मानतो* -अभिजीत पाटील. महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी माय-माऊलींना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी कायम प्रयत्न करणार* – अभिजीत पाटील. (माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथे ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम उत्साहात संपन्न)
बहिणींच्या आनंद हाच आशीर्वाद मानतो* -अभिजीत पाटील.
महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी माय-माऊलींना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी कायम प्रयत्न करणार* – अभिजीत पाटील.
(माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथे ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम उत्साहात संपन्न)
प्रतिनिधी/-
‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम मोठ्या आनंदात आणि माता भगिनींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. यातून त्यांना मिळणारा आनंद हाच मी आशीर्वाद मानतो, असे प्रतिपादन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले.
सध्या विधानसभेच्या तोंडावर मतदारसंघांमध्ये भेटीगाठी व कार्यक्रम घेण्याच्या दृष्टीने अभिजीत पाटील आपला जनसंपर्क वाढवत असून विविध कार्यक्रम घेत असताना माढा तालुक्यात अभिजीत पाटील यांनी आपला चांगला चंग बांधलेला दिसून आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माढा केसरी म्हणून कुस्ती स्पर्धा टेंभुर्णी येथे घेण्यात आल्या होत्या. अभिजीत पाटील यांनी माढा तालुक्यातील माळशिरस तालुक्यात जोडलेल्या 14 गावांमध्ये देखील आपला जनसंपर्क वाढवत असल्याचे दिसून आले.
नागपंचमी व रक्षाबंधनानिमित्त विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित अभिजीत आबा पाटील मित्रपरिवार महाळुंग यांच्या संकल्पनेतून वतीने ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी श्री विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील बोलताना म्हणाले…संसाराची जबाबदारी पेलून अविरत कर्तव्य पार पाडणाऱ्या माता भगिनींना विरंगुळ्याचे आणि एकत्रित आनंदाचे काही तास मिळावे यासाठी या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यास मिळणाऱ्या उस्फुर्त प्रतिसाद आणि सर्व वयोगटातील सहभाग यामुळे प्रत्येक गावात हा कार्यक्रम यशस्वी होत आहे. ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाला महाळुंग येथे उस्फुर्त प्रतिसाद.. शेकडो महिलांनी विविध खेळांमध्ये सहभाग घेतला आणि उत्कृष्ट संयोजनातून विलक्षण आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या सर्व खेळामध्ये प्रथम क्रमांकाच्या विजेत्या सौ.जागृती सुरज कुंटे, द्वितीय क्रमांकाच्या सौ.सोनाली औदुंबर जाधव, तृतीय क्रमांकाच्या रूपाली प्रभाकर भगत व चतुर्थ सौ.वैष्णवी प्रशांत काळे या मानकरी ठरल्या.या कार्यक्रमाचे निवेदिका मोनिका जाजू यांनी केले.
यावेळी नगराध्यक्षा लक्ष्मीताई चव्हाण, श्रीमतीदेवी मदन पाटील, मा.सरपंच अर्पणदेवी काकी पाटील, नगरसेवक प्रकाश नवगिरे, शिवसेना तालुका उपप्रमुख नितीन वाघमारे, सिद्धेश्वर पवार, भाग्यश्री भोसले, सुवर्णा गाडेकर, नेहा तळेकर, सोनाली जगताप, जयश्री दासू जमदाडे, जयश्री बनसोडे, निता शिंदे, रूपाली जमदाडे, संगीता बागल, मंदाकिनी पाटील, भारती बनसोडे, सुनीता मोटे, शितल लवटे, सुरेखा थिटे, वर्षाला वाघमारे, सविता बचुटे यासह अजिंक्य पाटील, सुनिल भोसले मित्र परिवारांने यशस्वी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
Hmm it seems like your blog ate my first comment (it was extremely long) so I guess I’ll just sum it up what I submitted and say, I’m thoroughly enjoying your blog. I too am an aspiring blog blogger but I’m still new to everything. Do you have any recommendations for beginner blog writers? I’d certainly appreciate it.