श्री विठ्ठल अर्बन मल्टीस्टेट निधी लिमिटेड,पंढरपूरचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा

आनंद आणि एकात्मतेच्या वातावरणात श्री विठ्ठल अर्बन मल्टीस्टेट निधी लिमिटेड,पंढरपूरचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने श्री सत्यनारायण महापूजा संचालक श्री.शांतिनाथ अर्जुन बागल व त्यांच्या धर्मपत्नी सौ.विजयाताई शांतिनाथ बागल यांच्या शुभहस्ते पार पडला.
या तीन वर्षांच्या प्रवासात संस्थेने समाजातील विश्वास संपादन करत आर्थिक पारदर्शकता, प्रगती आणि सामाजिक बांधिलकी यांचा आदर्श निर्माण केला आहे. आगामी काळातही “विश्वासाचा पाया, विकासाची वाट” या ध्येयाने संस्था जनसेवेसाठी कटिबद्ध राहील.
सर्व सभासद, ठेवीदार, हितचिंतक आणि शुभेच्छुक यांचे मनःपूर्वक आभार आपल्या सहकार्यामुळेच ही वाटचाल इतकी यशस्वी आणि अभिमानास्पद ठरली आहे..!
श्रीविठ्ठल अर्बन मल्टीस्टेट निधी लि. पंढरपूर