भाजपा शहराध्यक्ष लाला उर्फ रोहित पानकर यांचा गुरुवारी वाढदिवस वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रमांची तयारी

भाजपा शहराध्यक्ष लाला उर्फ रोहित पानकर यांचा गुरुवारी वाढदिवस

वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रमांची तयारी

पंढरपूर (प्रतिनिधी)

पंढरपूरमधील अनिल नगर म्हटले की, गुन्हेगारी जगत दिसू लागते. याच अनिलनगर मध्ये लाला पानकर यांचा राजकीय उदय झाला.
या ठिकाणी राजकारण करायचे म्हटले की , खुद गब्बर असावे लागते. लाला यांनी अल्पावधीतच या सर्व गोष्टी मिळवल्या. संपत्ती आणि मान सन्मानाच्या जोरावर आणि संगतीच्या बळावर लाला पानकरचा राजकीय उदय झाला.

 

अनिलनगर मधील गुन्हेगारी पाहता, आपला मुलगा वाया जाऊ नये, याकरिता पानकर यांच्या वडिलांनी नवी पेठेत वडापावचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात लालाने जम बसवला. यावेळी त्याला खंबीर साथीदार मिळत गेले. वडापावच्या व्यवसायापासून त्याने मोठी मजल मारली. राजकारणातील चाणाक्ष

परिचारक कुटुंबाची नजर त्यांच्यावर पडली. मग काय लालाचा लाला साहेब झाला. एवढ्या वरच न थांबता भारतीय जनता पार्टी सारख्या राजकीय पक्षाने त्यांच्यावर
भाजपा शहर अध्यक्षपदाची जबाबदारी टाकली. लाला पानकर म्हटले की, भाऊ टमटमचे नाव चटकन तोंडात येते. असा हा दोस्ताना
पंढरपूर शहरात प्रसिद्ध झाला.

लाला उर्फ रोहित पानकर
सध्या पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी चर्चेत आले आहेत. त्यांचा गुरुवारी वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहरात विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
लाला पानकर आणि भाऊ टमटम मित्र मंडळाकडून यासाठी लगबग सुरू आहे. माजी आ. प्रशांत परिचारक आणि आ. समाधान आवताडे या दोघांचीही मर्जी त्यांच्यावर असून, या वाढदिवसामुळे भल्या भल्या राजकीय नेत्यांची झोप उडणार असल्याचे चित्र सध्या पंढरपूर शहरात दिसत आहे ‌.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या