पंढरपूर तालुक्यासाठी भरपूर विकास निधी उपलब्ध करून देणार :- खासदार प्रणिती शिंदे

पंढरपूर तालुक्यासाठी भरपूर विकास निधी उपलब्ध करून देणार :- खासदार प्रणिती शिंदे
खासदार प्रणिती शिंदे यांचा पंढरपूर तालुक्यातील शिरगाव व तावशी गावभेट दौरा तसेच तावशी येथील रस्ता खडीकरण कामाचे भूमिपूजन
खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदासंघांतील पंढरपूर तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावभेट दौरा आयोजित केला असून आज रोजी
◼️ शिरगाव
◼️ तावशी
या गावाला भेट देऊन गावातील जनतेचे प्रणितीताई शिंदे यांनी निवडून दिल्याबद्दल आभार मानले व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आणि निवेदने स्वीकारले.
यावेळी नागरिक, शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या.
आपल्या अनेक समस्या तत्काळ मार्गी लागल्याने व प्रश्नांचे निराकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आहेत
तसेच तावशी या गावात जिल्हा वार्षिक योजना सन २०२४ – २०२५ अंतर्गत खासदार प्रणिती शिंदे यांच्या खासदार निधीतून २०१५/१४१६ अंतर्गत मूलभूत सोयी सुविधा पुरविणे २०२४- २५ ग्रामपंचायत तावशी येथील रानमळा रस्ता ते दौलत आसबे रस्ता खडीकरण करणे या कामासाठी ०५ लाख निधी मंजूर करण्यात आले. या निधीतून जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग सोलापूर यांच्या वतीने होणाऱ्या कामाचे भूमिपूजन खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या गाव भेट दौऱ्यात काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष संदीप पाटील, नितीन शिंदे संजय यादव, बाळासाहेब यादव,
हनुमंत आसबे, सरपंच
अमोल कुंभार, उपसरपंच
दिपक पाटील, औदुंबर घाडगे, दत्तात्रय घाडगे, सरपंच धनाजी माने, मेजर दत्तात्रय घाडगे, दिलीप वाडेकर, शिवाजी घाडगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
▬▬▬