पंढरीत रंगणार आमदारांचा सत्कार सोहळा राष्ट्रवादीकडून पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीची जुळवाजुळव सुरू

पंढरीत रंगणार आमदारांचा सत्कार सोहळा
राष्ट्रवादीकडून पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीची जुळवाजुळव सुरू
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर शहरातील अनिल नगर येथे आमदारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून , राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माढा आणि मोहोळ मतदार संघाचे दोन्ही आमदार या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. सोमवार दि.२७
मार्च रोजी संपन्न होणाऱ्या या सत्कार सोहळ्यास , पंढरपूर शहरातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन , या सोहळ्याचे आयोजक अक्षय प्रताप गंगेकर यांनी केले आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत पंढरपूर तालुक्यातील दोन आमदारांनी बाजी मारली. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील हे माढा मतदारसंघात विजयी झाले. याचवेळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू खरे यांनी मोहोळ मतदार संघात विजय मिळवला. याचवेळी पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातून निवडणूक लढवलेले
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार
अनिल सावंत यांचाही सन्मान या सोहळ्यात करण्यात येणार आहे. या आमदारांचा नागरी सत्कार पंढरपूर शहरातील अनिल नगर येथे करण्याचे आयोजन येथील
गंगेकर बंधूंनी केले. सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजता हा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून घेण्यात आलेला हा नागरी सन्मान सोहळा , पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीची जुळवाजुळव तर नाही ना , अशी चर्चा पंढरपूर तालुक्यात रंगू लागली आहे.
या सत्कार सोहळ्यास पंढरपूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले, शिवसेनेचे माजी जिल्हा अध्यक्ष साईनाथ भाऊ अभंगराव, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे शिंदे
हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा सन्मान सोहळा , नगरसेवक प्रताप गंगेकर तसेच काँग्रेस नेते नागेश गंगेकर यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.
या सत्कार सोहळ्यास पंढरपूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष, साधनाताई भोसले,
राजश्रीताई प्रताप गंगेकर, नगरसेविका रंजनाताई पवार,
समाजसेविका भारतीताई नागेश गंगेकर, अनुराधा वाडेकर, सुनंदाताई उमाटे आणि शुभांगीताई भोईटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाचे संयोजक अक्षय प्रताप गंगेकर, अभिषेक प्रताप गंगेकर , विवेक नागेश गंगेकर आणि सुरज बाबुराव गंगेकर
यांनी अतिशय नियोजन पद्धतीने हा कार्यक्रम आखला असून , या कार्यक्रमात पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीची तयारी साधली जाणार आहे , अशी चर्चा या परिसरातून होत आहे.
या कार्यक्रमास पंढरपूर शहरातील दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत.
यामध्ये सुभाष भोसले ,संतोष नेहतराव, सुरेश नेहतराव , शंकर पवार , डी राज सर्वगोड , उमेश पवार, धनंजय कोताळकर , मोहम्मद उस्ताद, अरुण भाऊ कोळी, अनिल अभंगराव,
दीपक वाडदेकर, रवी मुळे,
श्रीकांत पवार यांच्यासह अनेक दिग्गज मंडळींचा सहभाग राहणार आहे.
पंढरपूर शहरातील अनिल नगर येथील भगवती मंदिर येथे हा नागरी सत्कार सोहळा सोमवार दि.२७ जानेवारी रोजी, संपन्न होणार असून , हा सोहळा यशस्वी करण्यासाठी राहुल भिंगारे , दिनेश गंगेकर , गणेश पिंपळे , राहुल गंगेकर यांच्यासह त्यांची टीम परिश्रम घेत आहे.