आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नाने माढा मतदार संघातील रस्ते होणार चकाचक

*आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नाने मतदार संघातील रस्ते होणार चकाचक*

*मतदार संघातील रस्त्यांच्या कामासाठी आ. अभिजीत पाटील यांचे केंद्रीय मंत्र्यांकडे साकडे*

*केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी केली मागणी*

प्रतिनिधी/-

माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी केंद्रीय रस्ते महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन मतदार संघातील विविध रस्त्यांच्या कामाबाबत निवेदन देऊन संबंधित कामे मार्गी लावण्याची विनंती केली. यावेळी आमदार पाटील यांनी महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाची मूर्ती देऊन गडकरी यांचे स्वागत केल. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी निवडणुकीदरम्यान मतदार संघातील नागरिकांना मतदारसंघातील रस्ते चकाचक करण्याचे आश्वासन दिले होते. मतदार संघातील रस्ते पूर्ण व्हावेत यासाठी त्यांनी केंद्रीय रस्ते महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन माढा मतदारसंघातून जाणारा श्री संत मुक्ताई पालखी महामार्गाला राज्य महामार्ग दर्जा देऊन निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. माढा मतदारसंघातून करमाळा- टेंभुर्णी- पंढरपूर- मंगळवेढा रस्ता चौपदरी करावा. पंढरपूर (तिर्हेमार्ग) देगाव- सुस्ते- टाकळी सिकंदर- कुरुल रस्ता चौपदरी करावा. याचबरोबर मतदारसंघातील अनेक रस्त्यांच्या कामाबाबत निवेदन देऊन लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली आहे.

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नांमुळे मतदार संघातील रस्ते चकाचक होणार आहेत.

2 thoughts on “आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नाने माढा मतदार संघातील रस्ते होणार चकाचक

  1. Hello very cool site!! Man .. Beautiful .. Superb .. I will bookmark your site and take the feeds also?KI am happy to seek out so many useful information right here in the submit, we’d like develop more strategies on this regard, thanks for sharing. . . . . .

  2. I’ve been absent for a while, but now I remember why I used to love this blog. Thanks , I will try and check back more frequently. How frequently you update your website?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या