अनगरचे अप्पर तहसील कार्यालय रद्द करा आमदार राजाभाऊ खरे यांचे निषेध आंदोलन अनगर अप्पर रद्द करण्यासाठी सभागृहात व रस्त्यावर लढाई लढण्यास मी तयार आहे

अनगरचे अप्पर तहसील कार्यालय रद्द करा
आमदार राजाभाऊ खरे यांचे निषेध आंदोलन
अनगर अप्पर रद्द करण्यासाठी सभागृहात व रस्त्यावर लढाई लढण्यास मी तयार आहे
पाशवी बहुमताच्या जोरावर राज्य सरकार मोहोळ तालुक्यातील ४२ गावांना वेठीस धरत आहे. आमच्या आई, बहिणी मोहोळ तालुक्यातील टोकाच्या गावाला जाऊन सर्व शासकीय दाखले काढणार का ? तुगलकी पाटीलकीने मोहोळ तालुक्यावर अन्याय करणारा घेतलेला निर्णय आहे.
मोहोळ तालुक्यातील पन्नास वर्ष एक हाती सत्ता असणाऱ्या या पाटलांची सत्ता या ४२ गावातील नागरिकांनी उलथवून लावली व माझ्यासारख्या टांगेवाल्याच्या मुलाला जनतेने आपले प्रश्न विधिमंडळात मांडण्यासाठी आमदार केले. त्यामुळे ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे.
या ४२ गावावरील होणारा अन्याय दूर करण्यासाठी व या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी व मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी मोहोळ तालुक्याच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने पहावे यासाठी मी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले आहे. यापुढे सभागृहात आणि रस्त्यावर दोन्ही पद्धतीची लढाई लढण्यास मी तयार आहे.