हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी आणि श्रीयश रेस्टॉरंटचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन सुदामाच्या भेटीला श्रीकृष्ण आले!: दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केल्या भावना.

हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी आणि श्रीयश रेस्टॉरंटचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

सुदामाच्या भेटीला श्रीकृष्ण आले!: दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केल्या भावना.

पंढरपूर /प्रतिनिधी

पंढरपूर टेंभुर्णी पुणे रोडवरील करकंब तालुका पंढरपूर येथे हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी व श्रीयश रेस्टॉरंटचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी
आमदार अभिजीत पाटील, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, कोळी महासंघाचे नेते अरुण कोळी, ज्येष्ठ नेते नानासाहेब कदम यांच्यासह पंढरपूर शहरातील आजी-माजी नगरसेवक व विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

विठुरायाची पावनभूमी पंढरी नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी मुंबई पुण्याच्या धरतीवर टेंभुर्णी-पुणे रोड करकंब तालुका पंढरपूर येथे पंचतारांकित दर्जाचे हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी आणि हॉटेल श्रीयश रेस्टॉरंटची निर्मिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संकल्पनेतून धोत्रे परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे.

हॉटेल ग्रँड या पंचतारांकित हॉटेलची १ लाख ४ हजार स्क्वेअर फुट जागेत निर्मिती करण्यात आली आहे.
यामध्ये ५० रूम, तीन हजार स्क्वेअर फुटचा प्रशस्त हॉल, पंचवीस हजार स्क्वेअर फुट लॉन गार्डन, स्विमिंग पूल, पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
याचबरोबर या ठिकाणी हॉटेल श्रीयश रेस्टॉरंटची मुंबईच्या धरतीवर निर्मिती करण्यात आली आहे.
यामध्ये पंचतारांकित हॉटेल प्रमाणे विविध प्रकारच्या जेवणाचे मेनू मिळणार आहेत.
याद्वारे १०० तरुणांना रोजगार मिळणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर नजीक असलेल्या पंचतारांकित दर्जाचे हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी आणि श्रीयश रेस्टॉरंट भाविकांनी नागरिकांसाठी खुले झाले आहे.

श्रीकृष्ण आले सुदामाच्या भेटीला!

एक नेता एक झेंडा एक पक्ष हे तत्व बाळगून काम करणारे महाविद्यालयीन जीवनापासून राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी उभारलेल्या हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी आणि श्रीयश रेस्टॉरंटचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडले.
यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ‘श्रीकृष्ण सुदामाच्या भेटीला आले आहेत असे उद्गार काढले.
माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला बळ देण्याची काम राज साहेब ठाकरे यांनी केल्याच्या भावना व्यक्त केल्या.

4 thoughts on “हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी आणि श्रीयश रेस्टॉरंटचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन सुदामाच्या भेटीला श्रीकृष्ण आले!: दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केल्या भावना.

  1. hi!,I like your writing very a lot! proportion we communicate extra about your post on AOL? I need an expert on this house to resolve my problem. May be that’s you! Taking a look ahead to look you.

  2. I’m writing to make you know what a helpful discovery my friend’s daughter gained studying your web page. She mastered a good number of issues, including what it is like to possess a very effective giving character to have the mediocre ones clearly fully grasp chosen specialized subject areas. You really exceeded people’s desires. Thanks for providing these effective, dependable, informative and even cool tips on your topic to Sandra.

  3. I have read some good stuff here. Definitely worth bookmarking for revisiting. I wonder how much effort you put to make such a excellent informative website.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या