खमंग उखाणे अन मसाले दूध हळदी कुंकू समारंभात महिला जाम खुश …

खमंग उखाणे अन मसाले दूध

हळदी कुंकू समारंभात महिला जाम खुश …

पंढरपूर (प्रतिनिधी)

अनिल नगरमध्ये सामाजिक उपक्रमांची मालिकाच सुरू झाली. येथील गंगेकर बंधूंनी
घेतलेल्या हळदीकुंकू समारंभात ,
महिला वर्गाने हवाच टाइट केली.
एकापेक्षा एक खमंग उखाणे घेत
या समारंभाचा आनंद लुटला. हा कार्यक्रम म्हणजे महिलांसाठी मोठी मेजवानी … या कार्यक्रमाचा आनंद महिलांनी
भरभरून घ्यावा , आणि सामाजिक सलोखा टिकवावा , असे आवाहन माजी नगराध्यक्षा
साधनाताई भोसले यांनी केले.

पंढरपूर शहरातील गंगेकर परिवार दरवर्षीच महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करत असतो. यावर्षीही त्यांनी भव्य समारंभाचे आयोजन केले.
या समारंभास पंढरपूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा
साधनाताई भोसले, शैलाताई अनिल सावंत, माजी नगराध्यक्षा
राजश्रीताई गंगेकर , भारतीताई गंगेकर , रंजनाताई पवार, लक्ष्मीबाई गंगेकर आदी मान्यवर
भगिनी आणि माता उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या आयोजिका
अंजलीताई अक्षय गंगेकर आणि नेहाताई अभिषेक गंगेकर यांनी
जमलेल्या शेकडो महिलांचे जोरदार स्वागत केले.

हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा महिलांच्या हक्काचा कार्यक्रम.
या कार्यक्रमात महिलांना मोठे स्वातंत्र्य असते. या निमित्ताने
महिला वर्ग सेल्फी घेऊन त्याचे अदानप्रदान करत असतो. आणि यावर महिलांमध्ये मोठी चर्चा होत असते , यामुळे सामाजिक सलोखा निर्माण होतो. भारतीय संस्कृतीचा हळदी कुंकू समारंभ
हा मोठा ठेवा आहे , महिलांसाठी ही संधी उपलब्ध करून देणाऱ्या
गंगेकर कुटुंबाचे त्यांनी आभार मानले. शैलाताई अनिल सावंत यांनी या समारंभानिमित्त महिलांना शुभेच्छा दिल्या.

रविवार दि. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता येथील
भगवती मंदिर चौकात बघता बघता शेकडो महिला जमा झाल्या. हळदी कुंकू समारंभ सुरू झाला. प्रस्तविकात अंजलीताई गंगेकर यांनी उपस्थित महिलांना धन्यवाद दिले. आणि सुरू झाला उखाण्यांचा मामला . महिलांनी एकापेक्षा एक उखाणे घेऊन ,
या समारंभात मोठी जान आणली. महिलांना जागेवरच
मसाला दुधाचे वाटप करण्यात आले . मसाले दुधाचा आस्वाद घेत , महिलांनी उखाण्याचा बार उडवला . अंजलीताई आणि नेहाताई गंगेकर यांनी प्रत्येक महिलेला हळदीकुंकू लावून , त्यांची बोळवण केली. भारतीय संस्कृतीला साजेश्या अशा या
समारंभाचा महिलांनी मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमाची
व्यवस्था पाहण्याचे काम , अक्षय गंगेकर, अभिषेक आणि विवेक गंगेकर यांनी केले. या कार्यक्रमावर नगरसेवक प्रताप गंगेकर हे लक्ष ठेवून होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या