MAHAPEX -२०२५ टीम रायगड एक्सप्रेस च्या ई-सायकल रॅली चे पंढरपूर डाक विभाग कडून जंगी स्वागत..

MAHAPEX -२०२५ टीम रायगड एक्सप्रेस च्या ई-सायकल रॅली चे पंढरपूर डाक विभाग कडून जंगी स्वागत….

दिनांक २२ जानेवारी २०२५ ते २५ जानेवारी २०२५ या कालावधी मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर ,मुंबई येथे होणाऱ्या MAHAPEX -२०२५ (डाक तिकिटांचे प्रदर्शन) अंतर्गत जनजागृती साठी छत्रपती संभाजीनगर येथून दिनांक ०२ जानेवारी २०२५ रोजी निघालेली ई-सायकल रॅली पंढरपूर मध्ये काल दिनांक १६ जानेवारी २०२५ रोजी सोलापूरहुन दाखल झाली होती. या ई सायकल रॅली चे पंढरपूर डाक विभागाचे डाक अधीक्षक श्री. चंदक्रांत भोर साहेब, सहा. अधीक्षक श्री. एम. एम. पाटील साहेब, यांच्या मार्गदर्शानुसार काल टीमचे मुख्य श्री. श्रीकांत माने सहा. अधीक्षक (प्रवास) धाराशिव विभाग आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे विठुरायाच्या पावन नगरीमध्ये मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात स्वागत करण्यात आले. यावेळी या ई- सायकल रॅलीमध्ये सहभागी झालेल्या टीमचा व पंढरपूर मधील डाक तिकिटांचे संग्राहक डॉ. श्रीधर यलमार यांचाही सन्मान करण्यात आला.
दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. श्री. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पंढरपूर येथील द.ह. कवठेकर प्रशाला येथे रॅलीतील टीम रायगड एक्सप्रेस टीम प्रमुख श्रीकांत माने साहेब यांनी पोस्ट ऑफिस च्या तिकीट जमा / गोळा करण्याच्या छंदाबाबत, ढाई आखार पत्र लेखन स्पर्धेबाबत शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांना माहिती दिली. तसेच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी सायकल वापराचे आवाहन केले. विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा दिली. त्यानंतर बाल विठ्ठल रुक्मिणी आणि वारकरी यांच्या सह नामदेव पायरी येथे श्री. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महापेक्स २०२५ च्या ध्वजाचे अनावरण भजन, कीर्तन आणि टाळ, मृदूंग, वीणा यांच्या निनादामध्ये पंढरपूर विभागातील कमर्चारी बंधू भगिनी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले.
या प्रसंगी पंढरपूर डाक विभागाचे डाक अधीक्षक श्री. चंदक्रांत भोर सर, सहा. अधीक्षक श्री. एम. एम. पाटील सर, श्री. ज्ञानेश्वर देशमुख महाराज जळगावकर, उपाध्यक्ष विठठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर, पंढरपूर हेड पोस्ट ऑफीस चे पोस्टमास्तर सोमनाथ गायकवाड आणि पंढरपूर विभागातील कमर्चारी बंधू भगिनी यांनी रॅली च्या बारामती – सासवड- पुणे – महाड – रायगड मार्गे गेट वे ऑफ इंडिया, मुंबई या मार्गक्रमणासाठी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

6 thoughts on “MAHAPEX -२०२५ टीम रायगड एक्सप्रेस च्या ई-सायकल रॅली चे पंढरपूर डाक विभाग कडून जंगी स्वागत..

  1. I love your blog.. very nice colors & theme. Did you create this website yourself? Plz reply back as I’m looking to create my own blog and would like to know wheere u got this from. thanks

  2. I just could not depart your web site prior to suggesting that I really loved the usual information a person supply in your guests? Is gonna be again steadily in order to investigate cross-check new posts.

  3. The very heart of your writing while appearing reasonable initially, did not settle perfectly with me after some time. Somewhere throughout the paragraphs you actually managed to make me a believer unfortunately just for a very short while. I still have a problem with your jumps in logic and you would do nicely to fill in all those gaps. When you can accomplish that, I would undoubtedly end up being amazed.

  4. Hi, i think that i saw you visited my weblog thus i came to “return the favor”.I’m attempting to find things to enhance my site!I suppose its ok to use some of your ideas!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या