गादेगाव येथे होणार ८४ उत्कृष्ठ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा खा.शरद पवार यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजन
गादेगाव येथे होणार ८४ उत्कृष्ठ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा
खा.शरद पवार यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजन
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष लोकनेते खा.शरदचंद्र पवार यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त गादेगाव येथे त्यांच्या शैक्षणिक तसेच सामाजिक कार्याचा आदर राखत “शरद प्रेरणा’ म्हणुन गादेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल येथील ८४ उत्कृष्ट विद्यार्थी यांचा शालेय साहित्य देऊन गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पार्टी उद्योग व व्यापार विभागाचे वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते, पंचक्रोशीतील नागरिक विद्यार्थ्यांनी न्यू इंग्लिश स्कूल गादेगाव, ता. पंढरपूर येथे दि. 12 डिसेंबर वेळ सकाळी ९ वाजता उपस्थित राहावे. असे आवाहन प्रदेशाध्यक्ष नगेशदादा फाटे यानी केलें आहे.