ना मेरी उम्मीदे गीरी,ना मेरे उम्मीदों के मिनार गिरे,लेकीन मुझे गिराने की कोशीष में,लोग कई बार गिरे,बार बार गिरे… -अभिजीत पाटील
ना मेरी उम्मीदे गीरी,ना मेरे उम्मीदों के मिनार गिरे,लेकीन मुझे गिराने की कोशीष में,लोग कई बार गिरे,बार बार गिरे…
विठ्ठलाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्य नगरीतील एक राजहंस म्हणजे अभिजित पाटील,संघर्षातून साकार झालेलं समाजशिल्प म्हणजे अभिजित पाटील,कोणताही राजकीय वारसा नसल्यामुळे,राजकारणात स्थान मिळवताना एक शेतकऱ्याचं पोरं म्हणून खूप हेटाळणी झाली, बऱ्याच वेळा राजकीय प्रेशर आणून दाबण्यात आलं,चौकशा लावण्यात आल्या मात्र तो ना हरला,ना थकला ना बाजूला सरला,तो थेट प्रस्थापित लोकांशी,मोठ मोठ्या ताकदीच्या नेत्यांशी भिडत राहिला,अनेक प्रस्थापित नेते, पुढारी, त्यांचे चेले चपाटे यांनी अतिशय हीन,निकृष्ट पातळीपर्यंत जाऊन त्यांच्यावर टीका टिप्पणी केली,नको ते अभद्र बोललं गेलं, कोणी बाप काढला,तर कोणी आई,कोणी चोर बोलला,कोणी दरोडेखोर बोलला,इतकी अश्लील भाषा वापरली,की इथं नमूद ही करता येत नाही,ज्यांना गुळाचा कारखाना चालवता येत नाही,ज्याची पिठाची चक्की चालवायची लायकी नाही, ज्याला स्वतःच्या गावात सोडा,घरात कवडीची ही किंमत नाही अशा ही काही स्वयंघोषित नेत्यांनी आबांवर टीका करत तोंडसुख घेऊन जिभेचे चोचले भागवले,मात्र इतकं सर्व होऊन ही अभिजित पाटलांनी त्यांच्यावर एक ब्र शब्दही काढला नाही किंवा त्यांच्या टीकाणां उत्तरही दिलं नाही त्यांनी सर्व काही पोटात घालून घेतलं,व फक्त विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं, विकासाच्या व्हिजन वर बोललं गेलं….*
*कार्यकर्त्यांना तर विरोधकांनी खूप धारेवर धरलं होतं परंतु कार्यकर्त्यांना सुद्धा आबांनी काही संस्कार दिले होते त्या संस्कारानुसार कार्यकर्ते अगदी शांतपणे निमूटपणे सगळं सहन करत गेले;*
*”अभिजीत पाटील”हे एक असं नाव आहे,की ज्याच्या शब्द कोषात अशक्य हा शब्दच नाही, आपल्या चार ते पाच वर्षाचा राजकीय कारकीर्दीमध्ये अतिशय मेहनतीने, प्रचंड कष्टाने आणि आपल्या लाघवी, दिलदार, दानशूर, मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाने त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला शेतकरी- कष्टकरी माय बाप जनतेला,तरुण पोरांना जवळ केलं,त्यांना मायेची उब देत एक संघटन बांधलं, एक समूह तयार करून प्रथम श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना जो बंद अवस्थेत होता तो जिंकून घेतला,नंतर मंगळवेढ्यामध्ये तयारी करून अचानक माढा विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला,प्रचंड मेहनत, कष्ट, त्याग व इच्छा शक्तीच्या जोरावर,फक्त तीन महिन्यात तीस वर्षाची सत्ता तीस हजाराने उध्वस्त करून आज पंढरपूर माढा विधानसभेच्या विधानभवनात आमदार म्हणून विराजमान झाले, खरंतर ही गोष्ट एखाद्यासाठी स्वप्नवत अशीच होती, परंतु जर तुमच्यामध्ये प्रचंड कष्ट करण्याची तयारी असेल,तुमच्यामध्ये प्रबळ इच्छाशक्ती असेल,तुमचा स्वभाव मेहनती असेल त्यागाची, सहकार्याची वृत्ती असेल तर लोक तुमच्यावर प्रेम करतात समर्पणाच्या भावनेमुळे लोक तुमच्या जवळ येतात, त्या लोकांना एका धाग्यात बांधून ठेवण्याची ताकद तुमच्या मध्ये पाहिजे,जनतेची सेवा करण्याची वृत्ती तुमच्या मध्ये पाहिजे आणि अभिजीत पाटलांमध्ये नेमकं तेच गुण होतं,श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालवला, उत्तमरीत्या चालवला शेतकऱ्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला दिला, त्यांच्या उसाचे योग्य वजन केले, शेतकऱ्यांची,कष्टकऱ्यांची, कामगारांची फसवणूक केली नाही दिलेले सर्व शब्द पाळले, सहकाऱ्यांना बरोबरीची आणि मित्रत्वाची वागणूक दिली, ज्येष्ठांना मान सन्मान दिला आणि त्यामुळेच एका बाजूला प्रचंड गडगंज सत्ता, प्रचंड पैसा, अनुभवी मोठमोठे नेते असताना दुसऱ्या बाजूला अभिजीत पाटील फक्त कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडणूक लढवत होते,क्वचित दुसऱ्या आणि सरसकट तिसऱ्या फळीतील आणि सर्वसामान्य कार्यकर्ते अशीच गर्दी त्यांच्याकडे दिसत होती परंतु सर्वसामान्य जनतेच्या,तरुणांच्या, आबाला वृद्धांच्या मनात अभिजीत पाटलांनी एक घर केलेलं होतं, कारण अभिजीत पाटलांचं त्यांच्या कार्यकर्त्यांच्या द्वारे अभिजीत पाटलांच्या प्रत्येक दूरदृष्टी असलेल्या विकासाचे व्हिजन असलेल्या भाषणातून सर्वसामान्यांच्या घराघरात पोहोचलेलं होतं, कोरोना काळात त्यांनी केलेलं काम ऑक्सिजन निर्मितीचा प्रसंग त्याचबरोबर हॉस्पिटल निर्मितीचा प्रसंग, रुग्णांची केलेली सेवा शेतकऱ्यांची केलेली सेवा ही प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलेली होती वेगवेगळ कार्यक्रम घेऊन माता-भगिनींचा केलेला सन्मान चूल आणि मूल इतकच न सांभाळता त्यांना सामाजिक कामांमध्ये कार्यक्रमांमध्ये दिलेले मानाचे स्थान या सर्व गोष्टीमुळे अभिजीत पाटील माता भगिनींच्या मनामनात पोहोचलेला होता, आणि त्याचाच परिपाक म्हणजे एका प्रचंड शक्ती समोर माढा मतदार संघामध्ये जाऊन तीस हजार हून अधिक मताधिक्य घेत पहिल्याच प्रयत्नात विजेता होणं,ही काही साधीसुधी बाब नव्हती हि अशक्यप्राय वाटणारी गोष्ट होती परंतु अभिजीत पाटील यांनी आपल्या जिद्दीच्या,कर्तृत्वाच्या आणि प्रचंड त्यागाच्या जीवावर हे यश खेचून आणलं.आज अभिजीत पाटील सबंध महाराष्ट्रात एक जायंट किलर म्हणून ओळखले जातात,अभिजीत पाटील हा एक खमका नेता, खास मित्र आणि दानशूर व्यक्ती म्हणून ओळखले जातात हे यश कौतुकास्पद आहे, वाखाणण्याजोगे आहे,त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या नेतृत्वाला,त्यांच्या वक्तृत्वाला सर्वसामान्य जनतेचा सलाम आहे.निश्चितच येणाऱ्या काळामध्ये अभिजीत पाटलांनी मांडलेली दूरदृष्टी विकासाचे विजन त्यांच्या कर्तुत्वातून दिसून येईल,यात मुळीच शंका नाही,अभिजीत पाटलासारख्या शेतकऱ्याच्या पोराला हे यश मिळालं त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी,कष्टकरी आनंदित आहे, अभिजीत पाटलांकडून या मतदार संघाला खूप खूप अपेक्षा आहेत आणि अभिजीत पाटील निश्चितच या अपेक्षा वरती खरे उतरतील यात मुळीच शंका नाही अभिजीत पाटलांच्या यशात जितका त्यांच्या कष्टाचा वाटा आहे, कर्तुत्वाचा वाटा आहे तितकाच सर्वसामान्य नागरिक मतदार बंधू-भगिनी, कष्टकरी-शेतकरी कामगार माढा मतदारसंघातील सर्व सुज्ञ जनता सर्व नेते तसेच त्यांच्यासोबत वावरणारे त्यांचे सहकारी त्यांचाही सिंहाचा वाटा आहे त्या सर्वांना विशेष अभिनंदन आणि आबांच्या उज्ज्वल अशा दैदिप्यमान कारकीर्दीस अंतःकरणपूर्वक शुभेच्छा…!!*