मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी दिलीप धोत्रे यांना विजय करण्याचा निर्धार मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या दिलीप धोत्रे यांना मतदारांची साथ

मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी दिलीप धोत्रे यांना विजय करण्याचा निर्धार

मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या दिलीप धोत्रे यांना मतदारांची साथ

पंढरपूर/प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांच्या प्रचारसभांना मंगळवेढा तालुक्यातील विविध भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
गावा गावात त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे.
रविवारी त्यांनी मंगळवेढा तालुक्यातील सलगर खु, शिवनगी, सोद्दी, येळगी, डिकसळ, कागशत, कात्राळ,बालाजीनगर या गावांमध्ये मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली.

यावेळी ग्रामस्थांकडून ठिकठिकाणी त्यांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
यावेळी बोलताना दिलीप धोत्रे म्हणाली की मतदार संघात कोणतीही विकास कामे झाली नाहीत. तीन हजार कोटीची विकास कामे झाल्याचा दावा करणारे आमदारांनी कागदावर विकास कामे केली आहेत. यामुळे येथील जनता समस्याने त्रस्त झाली आहे. मतदार संघात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. अनेक युवक बेरोजगार झाले आहेत. त्यांना नोकरीसाठी बाहेरगावी जावे लागत आहे. मंगळवेढा तालुक्यात पाण्यावरच राजकारण केले जाते. मात्र प्रत्यक्षात नागरिकांना पाणी मिळत नाही. मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी येथील जनता राज ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून मला निवडून देतील असा विश्वास दिलीप धोत्रे यांनी यावेळी व्यक्त केला.

दिलीप धोत्रे यांनी मतदार संघात गाव भेट दौऱ्याच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यात ते यशस्वी झाले आहेत.
राजकारणाबरोबरच त्यांनी समाजकारणामध्ये मोठे योगदान दिले आहे.
मतदार संघातील नागरिकांना देव देवतांचे दर्शन घडावे यासाठी विविध यात्रेचे आयोजन करून हिंदू बांधवांना देव देवतांचे दर्शन घडवले होते.
यानंतर त्यांनी मुस्लिम बांधवांसाठी अजमेर यात्रा आणि बौद्ध बांधवांसाठी नागपूर दीक्षाभूमी यात्रेचे आयोजन करून दर्शन घडवले होते. याचा फायदा आगामी निवडणुकीत नक्कीच त्यांना होणार असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या