अनिलदादा मी तुम्हाला कधीच विसरू शकत नाही.. अनिल सावंत यांच्या सामाजिक कार्याची दखल घेणारा लवंगी येथील मुस्लिम बांधवाचा व्हिडिओ व्हायरल..

अनिलदादा मी तुम्हाला कधीच विसरू शकत नाही.. अनिल सावंत यांच्या सामाजिक कार्याची दखल घेणारा लवंगी येथील मुस्लिम बांधवाचा व्हिडिओ व्हायरल..
मंगळवेढा प्रतिनिधी:टीम सोलापूर आजतक
महाविकास आघाडीचे तुतारीचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या सामाजिक कार्याची पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात नेहमीच चर्चा होत आली आहे. भैरवनाथ शुगर उद्योग समूहाच्या माध्यमातून वैयक्तिक रित्या अनिल सावंत यांनी पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही तालुक्यातील अनेक लोकांना मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील लवंगी गावाचा रहिवाशी असणाऱ्या मिरासाहेब मुल्ला या मुस्लिम बांधवांचा अनिल सावंत यांच्या सामाजिक कार्याची दखल घेणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आणि या व्हिडिओची चर्चा सध्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर होत आहे. मिरासाहेब मुल्ला यांच्या पत्नी हाताच्या आजाराने त्रस्त होत्या. डॉक्टरांची सल्ल्यानुसार हाताची शस्त्रक्रिया करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येणार होता. पण अगदी बेताची परिस्थिती असणाऱ्या मुल्ला कुटुंबियांना मोठा खर्च झेपणार नसल्याने जवळपास मिरासाहेब मुल्ला यांच्या पत्नीचा हात निकामी होणार अशीच परिस्थिती असताना भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी शस्त्रक्रियेसाठी लागणारे पैसे स्वतःच्या खिशातून देत मदत केल्याने मुल्ला कुटुंबीयांवर आलेल्या संकटातून सावंत यांनी त्यांना वाचविले असल्यामुळे संपूर्ण मुल्ला कुटुंबीयांच्या वतीने अनिल सावंत यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त होत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यामुळे मतदार संघात अनिल सावंत यांच्या विषयी सकारात्मक चर्चा होताना दिसत आहे.
इतकेच नाहीतर अनेक लोकांना अनिल सावंत यांनी वैयक्तिकरित्या स्वतःच्या खिशातून आर्थिक मदत केली आहे. नैसर्गिक आपत्तीने एखाद्या शेतकऱ्याचे नुकसान झाले असुद्यात अथवा इतर काही कारणांवरून एखाद्या कुटुंबावर संकट आले असले तरीही अनिल सावंत यांनी भरघोस प्रमाणात मदत केली आहे. यामध्ये विविध जत्रा, जयंत्या, गणेशोत्सव, मंडळे, नवरात्र मंडळे, कुस्ती स्पर्धा क्रिकेट स्पर्धा ज्या ज्या लोकांना मदत केली आहे असे सर्वच लोक आणि सावंत यांच्यासाठी समोर येताना दिसत आहेत.
नुकत्याच झालेल्या नवरात्रीसाठी ज्योत आणायला गेल्यानंतर गोणेवाडी (ता.मंगळवेढा) येथील दोन युवकांचा अपघाती मृत्यू झाला होता. अनिल सावंत यांनी मृत्यू झालेल्या युवकांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेत त्यांना आर्थिक मदत केली.