कासेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी शोभाताई भोसले यांची बिनविरोध निवड वसंतराव देशमुख व परिचारक गटाचे पुन्हा वर्चस्व

कासेगाव ग्रामपंचायतीच्या
सरपंच पदी शोभाताई भोसले यांची बिनविरोध निवड

वसंतराव देशमुख व परिचारक गटाचे पुन्हा वर्चस्व

पंढरपूर प्रतिनिधी

कासेगाव तालुका पंढरपूर येथील परिचारक गटाचे विद्यमान सरपंच रिजवाना भालदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदावरती निवडणूक लागली होती या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत सदस्य शोभाताई भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.विरोधात कोणतेही गटाने अर्ज भरला नसल्यामुळे शोभाताई भोसले यांना 17 पैकी 17 मते मिळवून यांचा बहुमताने निवड करण्यात आली.यावेळी निवडणूक निर्णायक अधिकारी बाळासाहेब मोरे व ग्रामविकास अधिकारी रमेश कोळी यांनी निवडीचे अध्यक्ष उपसरपंच संग्रामसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शोभाताई भोसले यांची सरपंच पदी बिनविरोध निवड जाहीर केली निवडी नंतर कार्यकर्त्यांनी हालगीच्या कडकडाटासह फटाक्यांची आतिषबाजी केली आणि सगळा परिसरात दनाणुन गेला होता तसेच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करुन आपला आनंद उत्सव साजरा केला .

यावेळी उपस्थित पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे मा व्हाइस चेअरमन व सोलापूर जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख तसेच पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कासेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची निवड करण्यात आली. ग्रामविकास अधिकारी आर पी कोळी ,उप सरपंच संग्रामसिंह देशमुख, कासेगाव ग्रामपंचायत सदस्य हंसराज देशमुख, प्रकाश रुपनर अनिता जाधव सुनंदा भुसे गौरी वाघमारे पीर साहेब जमादार संजय उर्फ आबासाहेब देशमुख औदुंबर निकम सिद्धेश्वर खिलारे दीपक जाधव हरिभाऊ फुगारे आदी मान्यवर उपस्थित होते

ताज्या बातम्या