राज्यमंत्री भरणेंची तत्परता; स्वतःची गाडी रुग्णाला देऊन गेले टूव्हीलर वर घरी!

इंदापुर | वेळ सायंकाळी 7ची इंदापूर तालुक्‍यातील जंक्‍शनजवळ बारामती-इंदापूर राज्य महामार्गावर दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसताच त्याचवेळी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांची गाडी जवळून निघालेली होती, गर्दी पाहून भरणेनि गाडी थांबवली अंधारामुळे ये-जा करणारा प्रत्येक माणूस फक्त बघ्याची भूमिका घेत होता. जखमीची अवस्था पाहून क्षणाचाही विलंब न करता तातडीने स्वत:ची गाडी अपघातील रुग्णासाठी देऊन भरने हे दुचाकीवरुन घरी गेले. राज्यमंत्री भरणे यांनी तातडीने गाडी उपलब्ध करून दिल्यामुळे जखमीला तातडीने हॉस्पिटलमध्ये वेळेत पोचविणे शक्‍य झाले. त्यामुळे जखमीला तातडीने उपचार मिळण्यास मदत झाली.

आपली गाडी जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी देऊन राज्यमंत्री भरणे स्वत: दुचाकीवरून घरी गेले. भरणे यांच्या तत्परतेमुळे एका जखमीला तातडीने रुग्णालयापर्यंत पोचवणे शक्‍य झाले. त्यांची अलिशान गाडी रुग्णवाहिका झाल्यामुळे जखमीवर तातडीने उपचार होण्यास मदत झाली. दरम्यान, अपघातामध्ये विश्‍वनाथ सीताराम गोफणे यांच्या डोक्‍याला गंभीर मार लागला आहे. भरणे यांचे चालक पप्पू शिंदे यांनी 15 मिनिटांमध्येच गाडी बारामतीमधील खासगी रुग्णालयामध्ये पोचविली. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. भरणे यांच्या तत्परतेमुळे गोफणे यांना जीवदान मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या