दादांनी पुण्याला दिलेला शब्द होणार खरा; लवकरच जम्बो हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत होणार दाखल!

पुणे | शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीने जम्बो हॉस्पिटल उभारण्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासन जागे झाले असून, आता पिंपरी-चिंचवड येथे 10 दिवसांत एक तर पुण्यात २० दिवसांत दोन असे एकूण 3 जम्बो हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांना बेड्स उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध होत नाहीत. अश्या अनके प्रकारच्या तक्रारी पुण्याचे महापौर व भाजपच्या नगरसेवकांनी केल्या होत्या. व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू होण्याच्या घटना शहरात घडत आहेत.

त्यामुळे रुग्णांना दाखल करण्यासाठी रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध होत नाहीत. या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात उपमुख्यमंत्री अजित दादांच्या मार्गदर्शनाखाली जम्बो हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु निविदांच्या अटी शर्ती आणि वर्कऑर्डरमध्ये बराच वेळ जाण्याची शक्यता होती. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच्या बैठकीत प्रशासनाला जम्बो हॉस्पिटल तातडीने उभारण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करून निविदा प्रक्रिया पूर्ण करून २० दिवसांत प्रत्यक्षात जम्बो हॉस्पिटल सुरू करता येतील असे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या