दिलीप धोत्रे यांना विधानसभेत पाठवण्याचा मंदिर परिसरातील नागरिकांचा निर्धार मनसेच्या प्रचार फेरी दरम्यान अनेकांनी व्यक्त केल्या भावना मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांना पंढरपुरातून मोठे पाठबळ

दिलीप धोत्रे यांना विधानसभेत पाठवण्याचा मंदिर परिसरातील नागरिकांचा निर्धार

मनसेच्या प्रचार फेरी दरम्यान अनेकांनी व्यक्त केल्या भावना

मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांना पंढरपुरातून मोठे पाठबळ

पंढरपूर /प्रतिनिधी

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे अधिकृत उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचारार्थ पंढरपूर शहरातील विविध भागात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात येत आहे.
या प्रचार फेरीची सुरुवात नामदेव पायरी येथून श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन करण्यात आली.
यावेळी मंदिर परिसरातील नागरिकांकडून ठिकठिकाणी मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी अनेक नागरिकांनी मंदिर परिसरातील नागरिकांच्या संकटात धावून येणाऱ्या दिलीप धोत्रे यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार केला असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

गेल्या काही दिवसापूर्वी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात कॅरिडॉर करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला होता. यामुळे मंदिर परिसरातील नागरिक भयभीत झाले होते.
यावेळी दिलीप धोत्रे यांनी मंदिर परिसरातील नागरिकांच्या बाजूने उभे राहून जनआंदोलन उभारून कॅरिडॉरला कडाडून विरोध केला होता.
यामुळे या परिसरातील नागरिकांना धोत्रे यांच्यामुळे मोठा दिलासा मिळाला होता. यामुळे विधानसभा निवडणुकीत नागरिकांच्या अडीअडचणीला धावून येणाऱ्या नेत्याच्या पाठीशी उभे राहून दिलीप धोत्रे यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार केल्याच्या भावना येथील नागरिक व्यक्त करत आहेत. पंढरपूर शहर व तालुक्यात मिळत असलेला प्रतिसाद पाहता दिलीप धोत्रे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सर्व पक्षांकडून देण्यात आलेल्या उमेदवारांच्या कामाची तुलना मतदारसंघातील नागरिकांकडून केली जात आहे.
यामध्ये दिलीप धोत्रे यांनी केलेल्या कामाच्या जोरावर मंगळवेढा आणि पंढरपूरात मनसेला विविध राजकीय आणि सामाजिक पदाधिकाऱ्यांकडून वाढता पाठिंबा मिळत आहे. सर्वसामान्यांसाठी लढणाऱ्या दिलीप धोत्रे यांच्या नावाला पहिली पसंती मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे मनसेचे अधिकृत उमेदवार दिलीप धोत्रे यांनी जनतेच्या संपर्कात राहून मतदार संघातील सर्वसामान्यांसाठी कायम लढा दिला आहे.
सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे पंढरपूर येथील संपर्क कार्यालय सदैव खुले असते.
दिलीप धोत्रे यांनी आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे मागील अनेक वर्षांपासून पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम केले आहे. पंढरपुरातील नागरिकांचा वाढीव कर माफ करणे, हिंदू, मुस्लिम स्मशानभूमी दुरुस्ती , पंढरपूर शहरातील रस्ते खड्डे मुक्त करणे, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आर्थिक मदत करणे, बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध करून देणे, महिलांना सक्षम बनवण्यासाठी लघुउद्योग उभा करून देणे याचबरोबर कोरोना काळात त्यांनी रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी पल्स कोविड हॉस्पिटलची निर्मिती तसेच एकही नागरिक उपाशी झोपणार नाही याची काळजी त्यांनी घेतली होती.
सध्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली रस्ते, वीज, पाणी आणि विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी तसेच बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी लवकरात लवकर एमआयडीसी उभा करणे, महिलांना सक्षम बनवण्यासाठी लघुउद्योग निर्माण करणे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी कायम जनतेच्या संपर्कात असलेले दिलीप बापू धोत्रे यांना मंगळवेढा व पंढरपूरातील नागरिकांचा कौल मनसेला मिळणार असून सामान्य नागरिकांसाठी लढणाऱ्या दिलीप धोत्रे यांच्या नावाला येथील नागरिकांची प्रथम पसंती असल्याचे राजकीय जाणकारातून बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या