दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिक्की) चा भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पाठिंबा. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने झाला निर्णय

दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिक्की) चा भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पाठिंबा.

पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने झाला निर्णय

सोलापूर प्रतिनिधीः

2014 पासून भाजप सरकार या देशांमध्ये आल्यानंतर अनुसूचित जाती व जमातीसाठी वेगळी योजना राबविण्यात आली. पूर्वी मागासवर्गीयांना कुठल्याही बँकेत गेल्यानंतर एक लाख रुपये लोन घेण्यासाठी सुद्धा त्यांना घर तारण आहे का? जागा तारण आहे का? अशा गोष्टींची विचारणा बँकांकडून करण्यात येत होती. त्याच्यानंतर जेव्हा डिक्कीची स्थापना झाली त्या नंतर मागासवर्गीयांसाठी उद्योजक घडविण्याचे काम सुरु झाले. ह्या देशामध्ये मागासवर्गीयांसाठी उद्योग करायचा असेल तर पैशाची गरज असताना कुठल्या बँकांची सेक्युरिटी नसताना बँका लोन देत नव्हत्या म्हणून स्टैंड अप इंडिया योजना ही 2017 सन अमलात आणण्यात आली. हे फक्त आणि एस्सी-एसटी ह्या उद्योगांसाठीच असून मागासवर्गीय हे नोकरी मागणारे नसून नोकरी देणार आहेत हा उद्देश आहे. म्हणून त्या स्टैंडर्ड अंतर्गत एस्सी-एसटी साठी एक कोटी रुपयांची व्यवसायासाठी एक कोटी रुपयांची कोणतेही तारण व जमीनदार न घेता या योजनेची बँकांमध्ये अंमलबजावणी करण्यात अली.

पुन्हा काही काळानंतर 2020 मध्ये आम्ही मोदी सरकारने विनंती केली की, देशभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125 व्या जयंती निमित्त देशभरामध्ये एक लाख 25 हजार राष्ट्रीयकृत बँकाना एका वर्षामध्ये फक्त एकाला एक कोटी फायनान्स करून त्याला उद्योजक बनवायचा टार्गेट देण्यात आले. मोदी सरकारने सर्व बँकांना रिझर्व बँकेकडून ही नोटिफिकेशन जाहीर करण्यात आली तेव्हापासून सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी अनुसूचित जाती जमातीसाठी एक एक उद्योजक व्यापार करण्यासाठी एक कोटीचा फायनान्स करण्यात आला. असे देशभरामध्ये सध्याचे स्थितीमध्ये स्टैंड अप इंडिया या योजनेअंतर्गत अडीच लाख मागासवर्गीय अनुसूचित जाती जमातिचे उद्योजक तयार झाले. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रोत्साहन योजना अंतर्गत 15% सबसिडी देण्यात आली. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून या योजने अंतर्गत लोन अमाऊंटच्या 25% सबसिडी देण्यात आली.

हे आतापर्यंत कोणत्याही सरकारने आत्तापर्यंत केले नव्हते. फक्त आणि फक्त मोदी सरकारने ही योजना यशस्वी करून दखवली. यासाठी म्हणून दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिक्की) चे पदाधिकारी व सोलापूर जिल्ह्यातील सदस्यांच्या वतीने सोलापूर लोकसभेचे उमेदवार माननीय रामभाऊ सातपुते यांना जाहीर पाठिंबा जाहीर करत आहोत.

ही योजना आणण्यासाठी डीक्की संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर मिलिंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवत आहोत.

म्हणून दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिक्की) सोलापूर शहर व जिल्हा यांच्या वतीने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत राम सातपुते यांना जाहीर पाठिंबा देत आहोत. राम सातपुते संपूर्ण बहुमताने निवडून येतील अशी हमी देण्यात आली.

या पत्रकार परिषदेस डीक्कीचे जिल्हा समन्वयक श्री सिद्धाराम चाबुकस्वार, श्री. विजय माने, श्री. दत्तात्रेय वाघमारे, श्री. आशीष धोलराव, श्री. डोंगरेश चाबुकस्वार आदि उपस्थित होते.

8 thoughts on “दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिक्की) चा भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पाठिंबा. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने झाला निर्णय

  1. F*ckin’ remarkable things here. I’m very glad to look your post. Thank you so much and i am looking forward to contact you. Will you please drop me a mail?

  2. What¦s Going down i’m new to this, I stumbled upon this I have found It positively helpful and it has helped me out loads. I hope to give a contribution & help other users like its aided me. Good job.

  3. This is a very good tips especially to those new to blogosphere, brief and accurate information… Thanks for sharing this one. A must read article.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या