अखेर 10वीच्या निकालाची प्रतीक्षा संपली; उद्या 29 जुलै ला लागणार निकाल!

पुणे | राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल बुधवारी दि २९ रोजी जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले. निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे. त्यामुळे जून महिन्यापासून सूरू असलेली दहावीच्या निकालाची प्रतीक्षा मंगळवारी अखेरीस संपली, त्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे समजते.

दरवर्षी जुनाच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर केला जातो. मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्याने उत्तरपत्रिका तपासणी आणि त्याच्याशी संबंधित कामे लांबली. त्यामुळे निकाल जुलैच्या अखेरीस जाहीर होईल, असे शिक्षण विभागाने यापूर्वी सांगितले होते. त्याप्रमाणे हा निकाल जाहीर होत आहे. राज्य मंडळाच्या वतीने मार्च २०२० मध्ये पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर दहावीच्या परीक्षेतील भूगोलाचा पेपर पुढे ढकलण्यात आला. मात्र पुन्हा लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आल्याने यंदा दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करून सरासरी गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला.

असा पहाता येणार निकाल:- वेबसाईट पुढीलप्रमाणे
www.mahresult.nic.in www.sscresult.mkcl.org www.maharashtraeducation.com “www.mahresult.nic.in”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या