दिल्ली | सोन्या- चांदीच्या दरवाढीने मंगळवारी नवा उच्चांक गाठला. सोन्याच्या दरात विक्रमी दीड हजारांची वाढ झाली, तर चांदीही तीन हजारांनी महागली. देशभरात प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सुवर्णबाजारात सोने प्रतितोळा ५४ हजार ५०० वर पोचले तर चांदीनेही ‘भाव’ खात ६७ हजारांचा टप्पा गाठला.

गेल्या चार महिन्यांपासून सोने- चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. दरम्यानचे काही दिवस सोडले तर ही दरवाढ सातत्यपूर्ण आहे. अवघ्या पाच महिन्यांत सोन्याच्या दरात प्रतितोळा सात हजारांची वाढ झाली असून चांदीतही आठ हजार रुपये भाववाढ झाली आहे. पुढच्या वर्षभरात सोन्याचा दर आणखी वाढेल त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच ठरू शकेल.

सोन्याची किंमत 80 हजारांवर पोहोचण्याची शक्यता असल्याचे मत मांडण्यात आले. गेल्या दोन वर्षांत सोन्याच्या गुंतवणुकीत वाढ झाली आहे. यातून चांगला रिटर्न मिळत असल्यानं ही गुंतवणूक वाढल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. गेल्या दोन वर्षांत सोन्याने 55 टक्के रिटर्न दिले आहेत. तर S & P 500 ने 11.3%  रिटर्न दिले आहेत. दुसरीकडे सेन्सेक्स जुलै 2018 मध्ये जितका होता त्यापेक्षा आता कमीच आहे. बँक ऑफ अमेरिकेच्या सिक्युरिटीने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार 2021 अखेर सोन्याचे दर 3 हजार डॉलर होण्याची शक्यता आहे. भारतीय चलन आणि दर यानुसार तेव्हा सोन्याची किंमत भारतात 83 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या