यंदा 10वीच्या सुद्धा निकालात मुलीच ठरल्या मुलांना भारी; मुलींची बाजी!

पूणे | राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकाल आज (बुधवारी) जाहीर केला आहे. राज्यातील ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही मुलींनीच बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी पेक्षा यंदाचा निकाल तब्बल १८.२० टक्के वाढला आहे. यंदाही बारावीच्या परीक्षेत बाजी मारत ९६.९१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ९३.९० टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थिंनींच्या निकालाची टक्केवारी ही विद्यार्थ्यांपेक्षा ३. १ टक्क्यांनी जास्त आहे. या परीक्षेत १५ लाख ८४ हजार २६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १५ लाख ७५ हजार १०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर, त्यापैकी १५ लाख १ हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

महाराष्ट्र राज्यातील विभागानुसार निकाल:

पुणे :  ९७.३४ टक्के
नागपूर :  ९३.८४ टक्के
औरंगाबाद :  ९२ टक्के
मुंबई :  ९६.७२ टक्के
कोल्हापूर : ९७.६४ टक्के
अमरावती :  ९५.१५ टक्के
नाशिक : ९३.७३ टक्के
लातूर : ९३.९ टक्के
कोकण : ९८.७७ टक्के
एकुण : ९५.३० टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या