लवकरच..आपण सर्वमिळून कोरोनाला हरवूयात; राजेश टोपे!
मुंबई | महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना संदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केलंय. ऑगस्ट महिन्यात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसतील मात्र सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णसंख्या कमी-कमी होताना पाहायला मिळेल असं म्हटलंय.
सध्या मुंबई, मुंबई मेट्रो पॉलिटन रिजन म्हणजेच ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, मिरा भाईंदर हे भाग आणि सोबतच पुण्यात कोरोनाचे जास्त रुग्ण आहेत. मात्र राज्यातील मोठ्या ‘हॉटस्पॉट’मध्ये पुढील आठवडाभरात रुग्ण संख्या कमी होताना पाहायला मिळेल असंही राजेश टोपे म्हणालेत. अजूनही मुंबई आणि पुण्यात रुग्णवाढीचा दर सर्वाधिक आहे. मात्र सध्या समोर येणारे आकडे हा कोरोनाचा ‘पीक पॉईंट’ म्हणजेच कमाल प्रमाण आहे. येत्या काळात, पुढील आठ दहा दिवसात मुंबईतील आणि पुण्यातील कोरोना रुग्णवाढ कमी होताना पाहायला मिळेल.
रुग्ण वाढ कमी होताना पाहायला जरी मिळाली तरीही कोरोना संपूर्णपणे नाहीसा व्हायला आणखी काही काळ जाईल असंही राजेश टोपे म्हणालेत. साधारणतः एखाद्या शहरात २० ते २५ टक्के लोकांना कोरोना लागण झाल्यास तिथली रुग्णवाढ कमी होताना पाहायला मिळते असं निरीक्षण असल्याचं टोपे म्हणालेत.