स्वेरीमध्ये नवनियुक्त उपजिल्हाधिकारी अनुपसिंह यादव यांचा सत्कार समारंभ संपन्न


स्वेरीमध्ये नवनियुक्त उपजिल्हाधिकारी अनुपसिंह यादव यांचा सत्कार समारंभ संपन्न
पंढरपूर: श्री विठ्ठल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इन्स्टीट्यूट, पंढरपूरमध्ये आज मुळचे तावशी (ता. पंढरपूर) गावचे असणारे नवनियुक्त उपजिल्हाधिकारी अनुपसिंह यादव यांचा स्वेरीचे संस्थापक सचिव आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी.रोंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या एमपीएससीच्या निकालामध्ये पंढरपूर तालुक्यातील तावशी या गावचे भूमिपुत्र असणारे अनुपसिंह अरुण यादव यांची महाराष्ट्रात पाचव्या क्रमांकाने पास होत उपजिल्हाधिकारी पदी निवड करण्यात आली. तावशीसारख्या एका छोट्या गावी आपले प्राथमिक शिक्षण घेऊन पुढे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत अनुपसिंह यादव यांनी शारजाह येथील पेट्रोलियम कंपनीच्या मुंबई येथील विभागात मोठ्या पगाराची नोकरी मिळवली. या नोकरीसोबतच त्यांच्याकडे नोकरीच्या अजून चार ऑफर्स होत्या. पण तेवढ्या यशावर न थांबता समाजासाठी काहीतरी करावे या भावनेने त्यांनी नोकरी करत असताना स्पर्धा परीक्षांची तयारी सुरु ठेवली. त्यातून पुढे विक्रीकर निरीक्षक, ए.एस.ओ., असिस्टंट कमिशनर स्टेट टॅक्स इ. पदे मिळवत नुकतेच त्यांनी कठोर परिश्रम आणि चिकाटी च्या जोरावर उपजिल्हाधिकारी हे पद मिळवले. ‘कोणताही खाजगी क्लास/शिकवणी न लावता सातत्य, प्रामाणिकपणा व स्वतःच्या प्रयत्नावर विश्वास ठेवल्याने हे यश मिळाले. तसेच स्वेरीने आज केलेल्या सन्मानाने मी भारावून गेलोय.’ असे मत त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. सत्कार समारंभ प्रसंगी अनुपसिंह यादव यांचे वडील अरुण यादव हे ही उपस्थित होते. प्रा. यशपाल खेडकर यांनी या सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.

73 thoughts on “स्वेरीमध्ये नवनियुक्त उपजिल्हाधिकारी अनुपसिंह यादव यांचा सत्कार समारंभ संपन्न

  1. We stumbled over here coming from a different page and thought I might as well check things out. I like what I see so now i am following you. Look forward to finding out about your web page yet again.|

  2. I seriously love your website.. Pleasant colors & theme. Did you build this amazing site yourself? Please reply back as I’m looking to create my own personal site and would like to know where you got this from or what the theme is called. Kudos!|

  3. We absolutely love your blog and find many of your post’s to be just what I’m looking for. Would you offer guest writers to write content for you personally? I wouldn’t mind composing a post or elaborating on a lot of the subjects you write with regards to here. Again, awesome web site!|

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!