श्रीकांत चव्हाण यांना कृतिशील शिक्षक पुरस्कार प्रदान
श्रीकांत चव्हाण यांना कृतिशील शिक्षक पुरस्कार प्रदान
महाराष्ट्र राज्य कृती समिती या संघटनेच्या वतीने यावर्षी दिल्या जाणाऱ्या जिल्हास्तरीय कृतिशील शिक्षक पुरस्कारासाठी विवेक वर्धिनी विद्यालयातील सहशिक्षक श्रीकांत कालिदास चव्हाण यांना यावर्षीचा कृतिशील शिक्षक पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. कोर्टी येथील सिंहगड कॉलेजच्या कॅम्पसमध्ये संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये हा पुरस्कार त्यांना देण्यात आला . श्री चव्हाण यांच्या शैक्षणिक , व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.यावेळी
अध्यक्ष स्थानी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड, माजी आमदार दत्तात्रय सावंत, दत्त विद्या मंदिर सुस्ते प्राचार्य सुधाकर पिसे, पर्यवेक्षक रणजित शिंनगारे,राजाराम कॉलेजचे प्राध्यापक शरद चव्हाण ,श्रीकांत चंदनशिवे राजूभाई मुलाणी , सतीश भंडारे ,प्रा. मधुकर भोसले, धनंजय भाजीभाकरे, पंडित घोडके, रोहित भोसले , आबासाहेब कांबळे, गणराज ढोबळे ,घाडगे सर बाळासाहेब बनसोडे ,रोहित पवार सर आदी मान्यवर व शाळेतील शिक्षक वृंद तथा मित्रपरिवार उपस्थित होते. श्रीकांत चव्हाण यांच्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.