विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी
– पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय गोडावुन, कराड रोड, पंचायत समिती कार्यालय समोर पंढरपुर येथे सुरू होणार आहे. याबाबतचे आदेश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन लंगोटे यांनी जारी केली असून, नागरिकांनी तसेच वाहनधारकांनी निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी केले आहे.

या अनुषंगाने पंढरपुर शहरात भारत निवडणुक आयोग यांचेकडील सुचनांनुसार मतमोजणी ठिकाणच्या भोवतालीचा परिसर (Pedestrian Zone) केवळ पादचारी परिसर घोषीत करणे आवश्यक असल्याने, मा. तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी पंढरपुर यांनी १. मतमोजणीच्या ठिकाणाच्या समोरील कराड रोड वर नवीन कराड नाका ते एसडीपीओ कॉर्नर, २. मतमोजणी ठिकाणच्या मागील बाजूस मार्केट यार्ड गेट समोरील रस्त्यावर साबळे अॅटोमोबाइल्स ते शिवशंकर बंगला, ३. मतमोजणी ठिकाणची उजवी बाजु व्हीआयपी रोड तसेच बेंद्रेकर एसटी डी रस्ता ते भीमरत्न वार्ताफलक कसबेसदन पर्यंतचा रस्ता या चर्तुर्सीमेमधील अंतर्गत भाग (Pedestrian Zone) केवळ पादचारी साठी घोषीत करण्यात आलेला आहे. तसेच उपविभागीय दंडाधिकारी पंढरपुर विभाग पंढरपुर यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहीता २०२३ चे क. १६३ नुसार शासकीय धान्य गोदाम पंढरपुर येथील परिसरात तसेच गोदाम भोवतीच्या सर्व रस्त्यांवर निवडणुक कामा व्यतिरीक्त अनावश्यकपणे थांबणे, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, खाजगी वाहने थांबवणे, या परिसरा मध्ये वादय वाजवणे, गोंगाट निर्माण करणे, घोषणा बाजी करणे, गर्दि अथवा जमाव करून कामकाजात अडथळा निर्माण करणे, शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे कामकाजात अडथळा निर्माण करणे अथवा कामकाजापासुन परावृत्त करणे यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.

दि. २३/११/२०२४ रोजी मतमोजणी करीता उपस्थित राहणारे पोलींग एजंट हे वेळेवर ओळखपत्र घेवुन शासकीय गोडावुन येथे उपस्थीत राहतील. तसेच निकाल ऐकण्या करीता येणारे राजकीय पक्ष, अपक्ष नेतेमंडळी, कार्यकर्ते यांनी उपरोक्त तालुका दंडाधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी, पंढरपुर यांनी लागु केलेल्या आदेशाचे अवलोकन करून आपआपली वाहने मार्केटयार्डच्या आतील बाजुस व श्रेयस पॅलेस, कराड रोड शेजारील गौतम विदयालया च्या जागेमध्ये रहदारीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेवून पार्क करावीत. व कोठेही रस्त्यावर उभे न राहता रेल्वे ग्राउंड च्या आत उभे राहुन निकाल ऐकण्यास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी केले आहे

3 thoughts on “विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

  1. Good write-up, I’m normal visitor of one’s blog, maintain up the nice operate, and It is going to be a regular visitor for a lengthy time.

  2. I found your weblog website on google and check a few of your early posts. Continue to keep up the superb operate. I just extra up your RSS feed to my MSN News Reader. Seeking forward to studying extra from you in a while!…

  3. Hello, you used to write excellent, but the last several posts have been kinda boring… I miss your tremendous writings. Past several posts are just a bit out of track! come on!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या