पंढरपूर तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत अशी ओळख मिळवलेल्या देगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री संजय घाडगे यांना गावातील शेकडो महिलांनी एकत्र येत मोठ्या प्रेमाने राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला
पंढरपूर तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत अशी ओळख मिळवलेल्या देगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री संजय घाडगे यांना गावातील शेकडो महिलांनी एकत्र येत मोठ्या प्रेमाने राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला
पंढरपूर प्रतिनिधी दगडू कांबळे: पंढरपूर तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत अशी ओळख मिळवलेल्या देगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री संजय घाडगे यांना गावातील शेकडो महिलांनी एकत्र येत मोठ्या प्रेमाने राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे.श्री संजय घाडगे यांनी अगदी अल्प कालावधीत आपल्या कामाच्या जोरावर आपली व देगाव ग्रामपंचायतीची संपूर्ण जिल्हाभरात ओळख निर्माण केली आहे. कोरोनाच्या काळातही त्यांनी गावातील अनेक नागरिकांना आर्थिक तसेच रुग्णालयातील सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी मोठ्या प्रमाणात मदत केल्याने त्यांचे नाव चर्चेत आले होते. यासोबतच त्यांच्या सरपंच पदाच्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये देगावसाठी आरोग्य उपकेंद्र मंजुरी,श्री संध्यावळी देवी पर्यटन विकास आराखडा यासह अनेक कामांना मंजुरी मिळवत सुमारे 14 कोटी रुपयांपेक्षा अधिक जा निधी त्यांनी गावासाठी खेचून आणला होता.याचबरोबर त्यांनी चालू केलेला ६ ते ८ दोन तास अभ्यासासाठी हा उपक्रम संपूर्ण राज्यभर गाजला होता.गावातील गोरगरीब लोकांची बंद पडलेली रेशन कार्ड,लाडकी बहीण योजनेचे मोफत अर्ज भरून देणे तसेच अनेक छोट्या-मोठ्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत त्यांनी देगाव मधील जनतेचे प्रेम मिळवले आहे. याचाच भाग म्हणून काल देगाव गावातील शेकडो महिलांनी एकत्र येत त्यांना राखी बांधून अनोखी भेट दिली आहे.