जलदिंडी प्रतिष्ठान,पुणे आयोजित राज्यस्तरीय निबंध व नवकल्पना निर्मिती स्पर्धेत सनराईज पब्लिक स्कूल शेळवे चे नेत्रदीपक यश.!!

जलदिंडी प्रतिष्ठान,पुणे आयोजित राज्यस्तरीय निबंध व नवकल्पना निर्मिती स्पर्धेत सनराईज पब्लिक स्कूल शेळवे चे नेत्रदीपक यश.!!

पंढरपूर प्रतिनिधी दगडू कांबळे -:पुणे येथील जलदिंडी प्रतिष्ठान,आयोजित राज्यस्तरीय निबंध व नवकल्पना निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते,सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून जवळपास पंधरा हजार शाळांनी सहभाग नोंदवला होता,सदर बक्षिस वितरण समारंभ आज रोजी एस.बी.पाटील स्थापत्य शास्त्र व कला महाविद्यालय आकुर्डी,पुणे येथील ऑडिटोरिअयम हॉल मध्ये अतिशय दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाला,सदर स्पर्धेमध्ये सनराईज पब्लिक स्कूल शेळवे च्या ई ८ वी,९ वी व १० मधील एकूण नऊ विध्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले त्या मध्ये ई ८ वी मधून

कु.संचिता बाबासाहेब पवार प्रथम क्रमांक, कु.ओम अनंता श्रीखंडे द्वितीय क्रमांक, कु.अक्षरा नागनाथ धुमाळ यांनी तृतीय क्रमांक पटकावला, तसेच ई ९ वी मधून कु.प्राची मारुती यलमार प्रथम क्रमांक, कु.प्रतिक्षा अण्णा पवार द्वितीय क्रमांक व कु.तनया तानाजी आसबे हिने तृतीय क्रमांक पटकावला,ई १० मधून कु.वैष्णवी संतोष नागटिळक हिने प्रथम क्रमांक पटकावला असून कु.संजीवनी अनंता श्रीखंडे व कु. वैष्णवी तात्या आसबे हिने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला,जलदिंडी प्रतिष्ठान पुणे व अभिव्यक्ती प्रतिष्ठान,रोटरी क्लब या सहयोगी संस्थेच्या वतीने दरवर्षी असे पर्यावरण विषयक व सामाजिक उपक्रम राबविले जातात,त्यामध्ये नदी स्वच्छता,भूजल पातळी वाढवणे, ग्लोबल वॉर्मिंग समस्या,प्रदूषण कमी करण्यासाठी आपला सहभाग असे विध्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारे नवोपक्रमशील विषय घेऊन त्यासाठी विध्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला वाव दिला जातो..

सदर बक्षिसे व पुरस्कार हे संस्थेच्या अध्यक्षा हर्षा जोशी,राजीव भवसार, सूर्यकांत सर,ओंकार गौरीधर, शिरीष पांडव,व्यंकटेश भताने,बाबासाहेब काळे इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आले,पांडुरंगाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंढरपूर सारख्या पवित्र भागातील विद्यार्थ्यांचा पुणे सारख्या विद्येचे माहेरघर असलेल्या शहरात सन्मान व गुणगौरव करताना आम्हाला खूप कौतुक आणि अभिमान वाटत असल्याची भावना संयोजकांकडून व्यक्त करण्यात आली, पहिल्याच प्रयत्नात प्रशालेने मिळवलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल संयोजकांकडून प्रशालेचा विशेष सन्मान करण्यात आला,सदर स्पर्धेसाठी सनराईज पब्लिक स्कूल मधून एकूण शंभरहून अधिक विध्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता,त्यासाठी सर्व विध्यार्थ्यांना प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक मोहन गायकवाड,संगीत आणि कला शिक्षक योगेश गायकवाड,राम मोकळे,सौ.दिपाली कुंभार,सौ.मनिषा गोरे व सर्व मार्गदर्शक शिक्षक, पालक ई.सर्वांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.विद्यार्थ्यांच्या या अतुलनीय यशाबद्दल सनराईज पब्लिक स्कूल शेळवे चे संस्थापक अध्यक्ष समाधान गाजरे,संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे,संस्थापक सचिव अंकुश गाजरे विध्यार्थ्यांचे पालक तसेच भारतीय रेल्वेचे प्रकाश साळुंखे,खेड भाळवणी गावचे युवा नेतृत्व बाबासाहेब पवार,शिवसृष्टी जनरल स्टोअर्स पिराची कुरोली चे मालक शंकर शिंदे,सर्व ग्रामस्थ तसेच सनराईज परिवाराने विद्यार्थ्यांच्या व प्रशालेच्या या यशाबद्दल कौतूक केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या