राज्य शासन जातीयवादी-गणेश अंकुशराव आदिवासी कोळी जमात बांधवांच्या राज्य पातळीवरील आंदोलनाला पंढरपुरातुन पाठींबा
राज्य शासन जातीयवादी-गणेश अंकुशराव
आदिवासी कोळी जमात बांधवांच्या राज्य पातळीवरील आंदोलनाला पंढरपुरातुन पाठींबा
पंढरपुर (प्रतिनिधी) : आदिवासी महादेव कोळी जमात बांधवानी विविध मागण्यांसाठी आजपासुन राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरु केले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासुन आदिवासी महादेव कोळी समाज आपल्यावरील अन्याय दुर करण्यासाठी आणि न्याय हक्कासाठी लढा देत आहे, परंतु राज्य शासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याने आता हा समाज आक्रमक झाला असुन आजपासुन संपुर्ण राज्यातील आदिवासी महादेव कोळी जमात बांधवांनी शासनाविरुध्द यल्गार पुकारुन मोठे जनआंदोलन उभारले आहे. या आंदोलनाला पंढरपुरातील आदिवासी कोळी जमात बांधवांनीही पाठींबा दर्शवला असुन आज महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांच्या नेतृत्वाखाली पंढरपुरातील आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे चौकात असंख्य कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणा देऊन आपला संताप व्यक्त केला आणि संपुर्ण राज्यभर सुरु झालेल्या आपल्या समाजाच्या आंदोलनाला पाठींबा जाहीर केला.
आदिवासी कोळी जमात बांधव यांच्या जातीच्या दाखल्यांचा प्रश्न, जात पडताळणी प्रमाणपत्राचा प्रश्न, आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या चंद्रभागेतील स्मारकाचा प्रश्न असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. विशेषत: जातीच्या दाखल्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. यासाठी आम्ही विविध मार्गाने वेगवेगळी आंदोलने केली, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांनाही अनेकदा निवेदनं दिली, परंतु याकडे कोणीही गांभिर्याने पहात नाही. शासन अन्य जातींच्या मागण्यांकडं लक्ष देतं, गंभीरपणे अन्य जातींचे प्रश्न सोडविण्यासाठी हालचाली करतं, परंतु आमच्याकडे मात्र जाणुनबुजून दुर्लक्ष केलं जातंय. याचाच अर्थ हे शासन जातीयवादी आहे हे स्पष्ट होत आहे. आता आम्ही आर या पारची लढाई हाती घेतलीे असुन न्याय मिळाल्याशिवाय आमचा समाज आता मागे हटणार नाही! आणि येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्ताधार्यांचे उमेदवार पाडणार! असा इशारा यावेळी बोलताना गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.
यावेळी गणेश अंकुशराव,अनिल माने, पांडुरंग सावतराव, वैभव फसलकर, दादासाहेब ननवरे, ज्ञानेश्वर कडलासकर, संपत सर्जे, दत्ता माने, रघुनाथ अधटराव, माऊली कोळी, शिवाजी नेहतराव, विकी अभंगराव, गणेश परचंडे, दत्ता कोळी, सोनु माने, मनोज कोताळकर, अमोल नेहतराव, अक्षय म्हेत्रे, भाऊसाहेब शिरसट, पोपट कोरे, नागेश अभंगराव, रोहन कांबळे, तुषार माने, पांडु माने, गहिनीनाथ कोळी, प्रकाश कोळी, पितांबर अंकुशराव, गणेश कोळी, भैया भादुले, ओंकार कांबळे, भैया तावसकर, संतोष तावसकर, यश अंकुशराव, दादा अभंगराव , गोट्या तांबीलकर, भैया भाळवणकर, भैया अधटराव, सागर अधटराव यांच्यासह असंख्य महादेव कोळी बांधव उपस्थित होते.