पंढरपूर स्वाभिमानी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी माने तर कार्याध्यक्षपदी गुरव

पंढरपूर स्वाभिमानी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी माने तर कार्याध्यक्षपदी गुरव

पंढरपूर(प्रतिनिधी)

पंढरपूर स्वाभिमानी पत्रकार संघ पंढरपूरच्या अध्यक्षपदी दैनिक नवमित्रचे संपादक सचिन माने यांची तर दैनिक कटूसत्यचे प्रतिनिधी अमोल गुरव यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.

पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर सदर निवडी करण्यात आल्या. पंढरपूर स्वाभिमानी पत्रकार संघाची बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये सचिन माने यांची एकमताने अध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आली. माने हे अनेक वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. पंढरपूर शहर व तालुक्यातील विविध सामाजिक प्रश्न मांडले आहेत.

यावेळी उपाध्यक्षपदी दैनिक एकमतचे मारुती वाघमोडे तर सचिवपदी श्रीधर येलमार यांच्या निवडी करण्यात आल्या.
याप्रसंगी कार्यकारी सदस्यपदी पांडुरंग सूर्यवंशी, दादा कदम, विकास सरवळे, शाहबाज पटेल, प्रदीप आसबे ,प्रमोद जगदाळे, अमिन शेख यांची निवड करण्यात आली.


यावेळी जेष्ठ मार्गदर्शक अविनाश साळुंखे, नवनाथ खिलारे, समाधान भोई उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या