सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय! रविवारी सुट्टीच्या दिवशी सर्व शासकीय कार्यालय राहणार सुरु- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय! रविवारी सुट्टीच्या दिवशी सर्व शासकीय कार्यालय राहणार सुरु- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
राज्यात अतिवृष्टीनंधुमाकूळ (Heavy Rain) घातला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे. दरम्यान, नागरिकांना या काळात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून उद्या रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये देखील सुरु राहणार आहेत.
जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थिच्या अनुषंगाने उपयोजना करण्यासाठी उद्या शासकीय कार्यलय सुरु ठेवण्याचे आदेश सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.
रविवारी सर्व शासकीय कार्यालय सुरु ठेवण्याचे आदेश
हवामान खात्याने उद्या देखील अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळं पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मदत आणि आपत्ती व्यवस्थापनचे काम करण्याकसाठी उद्या रविवारी सर्व शासकीय कार्यालय सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हे आदेश जाहीर केले आहेत.