शालेय विद्यार्थ्यांच्या दाखले वाटपसाठी पंढरपूर तालुक्यात विशेष शिबीर

शालेय विद्यार्थ्यांच्या दाखले वाटपसाठी पंढरपूर तालुक्यात विशेष शिबीर
पंढरपूर (दि.20):- दहावी व बारावी शालांत परीक्षेचे निकाल लागले असून, विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक असलेले दाखले सुलभ व सहज उपलब्ध व्हावेत तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक गरजांची पुर्तता व्हावी व विद्यार्थ्यांना आपले दाखले स्थानिक स्थरावर मिळावे या उद्देशाने तहसिल कार्यालय, पंढरपूर यांच्या मार्फत पंढरपूर तालुक्यात मंडळ स्थरावर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानातंर्गत विशेष शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली.
शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक आवश्यक दाखले (उदा. उत्पन्न, वय व अधिवास, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेयर दाखला व इतर दाखले तसेच नागरिकांना रहिवाशी, उत्पन्न व जातीचे दाखले देण्यासाठी तालुक्यात दि. 23 मे 2025 रोजी करकंब, खर्डी, चळे व भंडीशेगांव व दि. 27 मे 2025 रोजी पंढरपूर, तुंगत व कासेगांव तसेच दि. 30 मे 2025 रोजी रोपळे,पुळूज, पटवर्धन कुरोली, भाळवणी या महसूल मंडळाच्या ठिकाणी मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांच्या कार्यालयात विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
सदर शिबीरासाठी मंडळ निहाय महा ई सेवा केंद्र चालक यांची नेमूणक करण्यात आली असून, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांनी शालेय विदयार्थी व नागरिकांनी गांव निहाय महा ई सेवा केंद्र चालक यांचेशी समन्वय साधून, शिबीर आयोजित करुन सदर शिबीरामध्ये जास्तीत संख्येने दाखले देण्याचे कामकाज करावे तसेच जास्तीत संख्येने उपस्थित राहून दाखले प्राप्त करुन घ्यावेत.असे आवाहन तहसिलदार लंगुटे यांनी केले आहे.
०००००
4 thoughts on “शालेय विद्यार्थ्यांच्या दाखले वाटपसाठी पंढरपूर तालुक्यात विशेष शिबीर”
Comments are closed.