पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहून राजाराम नाईकनवरे यांची पुण्यतिथी साजरी

पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहून राजाराम नाईकनवरे यांची पुण्यतिथी साजरी

विविध कार्यक्रमांना फाटा देत सैन्यातील मुलाचा राखला मान

पंढरपूर(प्रतिनिधी):- स्वर्गीय राजाराम नाईकनवरे यांनी देशसेवे बरोबरच समाजसेवेचे कार्य आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत केले त्यांचा मोठा मुलगा सैन्यात मेजर असून लहान मुलगा अंपायर व समाज कार्यामध्ये आहे. नुकताच पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २७ नागरिकांना श्रद्धांजली वाहून एका वेगळ्या पद्धतीने स्वर्गीय राजाराम नाईकनवरे यांची चतुर्थ पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

स्वर्गीय राजाराम नाईकनवरे प्रतिष्ठान व सामाजिक संस्था यांच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रमाने पुण्यतिथी साजरी करण्यात येते. परंतु राजाराम नाईकनवरे यांचे चिरंजीव विक्रम नाईकनवरे हे भारतीय लष्करामध्ये आपली सेवा बजावत आहेत. अतिरेकी हल्ल्यानंतर त्यांना देश सेवेसाठी जावे लागले. त्यांचा मान राखत यंदा सर्व कार्यक्रमांना फाटा देत साधेपणाने पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
स्वर्गीय राजाराम नाईकनवरे यांचे कार्य समाजात मोलाचे व प्रेरणादायक होते. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे सर्वांना एकत्र घेऊन कार्य करण्याची त्यांची आवड तसेच गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व जनतेच्या अडीअडचणी सोडवून गरीब कुटुंबातील मुला मुलींच्या लग्नासाठी त्यांनी नेहमी मदत केली. प्रत्येक अडचणी सोडवल्याने स्वर्गीय राजाराम नाईकनवरे हे आपल्या कार्यामुळे आजही समाज माध्यमात स्थान मिळवून आहेत.

स्वर्गीय राजाराम नाईकनवरे यांचे दोन्ही चिरंजीव विक्रम नाईकनवरे व दीपक नाईकनवरे हे आजही गोरगरीब जनतेचे तसेच समाजातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवून मदतीला धावून जात असल्याने दादांच्या पावलावर पाऊल टाकून कार्य करत असल्यामुळेच आज स्वर्गीय राजाराम नाईकनवरे यांचे अस्तित्व समाजात टिकून असल्याचे बोलले जाते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वर्गीय राजाराम नाईक नवरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर परिसरातील महिला पुरुष यांनी प्रथम पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहून नंतरच दादांच्या प्रतिमेवर पुष्पांजली अर्पण केली.
पवित्र तुमची स्मृती,
अनंत तुमची माया,
नित्य असू द्या आमच्यावरती,
अखंड तुमची छाया,
या युक्ती प्रमाणे स्वर्गीय राजाराम नाईकनवरे यांचे कार्य समाजासमोर अखंडित राहो अशी आदरांजली यावेळी उपस्थितांतून वाहण्यात आली.

3 thoughts on “पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहून राजाराम नाईकनवरे यांची पुण्यतिथी साजरी

  1. Nice read, I just passed this onto a friend who was doing some research on that. And he actually bought me lunch as I found it for him smile Therefore let me rephrase that: Thanks for lunch! “Without friends no one would choose to live, though he had all other goods.” by Aristotle.

  2. Pingback: rybelsus for sale

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या