जागतिक परिचारिका दिनानिमित्त आरोग्य सेविकांचा सन्मान आणि गौरव….

जागतिक परिचारिका दिनानिमित्त आरोग्य सेविकांचा सन्मान आणि गौरव….
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील आरोग्य सेविकांचा जागतिक परिचारिका दिनानिमित्त मंगळवेढा शहरातील जनसंपर्क कार्यालयात भेट घेऊन सन्मान करत त्यांच्या समाजासाठीच्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्यात आला.
खरंतर, रुग्णाच्या वेदनांवर फुंकर घालणाऱ्या, उपचारांइतकीच मायेची साथ देणाऱ्या परिचारिका आरोग्य व्यवस्थेचा खरा आधारस्तंभ आहेत. त्याग, कळकळ आणि सेवा ही त्यांची खरी ओळख आहे. त्यामुळे जागतिक परिचारिका दिनादिवशी उपस्थित सहकाऱ्यांसमवेत त्यांच्या निःस्वार्थ सेवेला कृतज्ञतेने वंदन केले.
यावेळी मतदारसंघातील आरोग्य सेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Good site! I truly love how it is simple on my eyes and the data are well written. I am wondering how I could be notified when a new post has been made. I’ve subscribed to your RSS feed which must do the trick! Have a nice day!