पंढरपूर एसटी बस आगारात पाच नवीन बस दाखल आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते नवीन बसचे लोकार्पण

पंढरपूर एसटी बस आगारात पाच नवीन बस दाखल

आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते नवीन बसचे लोकार्पण

पंढरपूर /प्रतिनिधी

उन्हाळ्यात प्रवाशांची गरज लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या पंढरपुरात आगारात पाच नवीन एसटी बस दाखल झाल्या आहेत.
या नवीन बसचे पूजन व लोकार्पण आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी विभाग नियंत्रक अमोल गोंजरी, विभागीय वाहतूक अधिकारी अजय पाटील, वरिष्ठ आगार व्यवस्थापक योगेश लिंगायत यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की पुढील काळात पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता याचे बरोबर मतदार संघातील नागरिक विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ज्यादा एसटी बस शासनाकडून मिळाव्यात यासाठी पाठपुरावा केला आहे. लवकरच ज्यादा एसटी बस मिळतील असा विश्वास व्यक्त केला.

दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पंढरपूरला श्री विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल होत असतात.
त्या तुलनेत पंढरपूर आगारात बसची संख्या कमी होती, त्यात काही बस जुन्या झाल्यामुळे त्या वारंवार बंद पडत असून, काही बस स्क्रॅप करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे एसटी प्रशासनाच्या बसच्या वेळा आणि संचलनाचे नियोजन करताना चांगलीच तारेवरची कसरत होते.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पंढरपूर एसटीच्या ताफ्यात नवीन ५ बस दाखल झाल्या आहेत, तर पुढील काळात आणखीन ५ बस (लालपरी) दाखल होणार असल्याने प्रवाशांनी आणि एसटी प्रशासनाने समाधानाचा सुस्कारा सोडला आहे.
तसेच मंगळवेढा आगारासाठी ही बसची मागणी केली आहे.

4 thoughts on “पंढरपूर एसटी बस आगारात पाच नवीन बस दाखल आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते नवीन बसचे लोकार्पण

  1. Hi, Neat post. There is an issue together with your web site in internet explorer, may check this… IE nonetheless is the market leader and a huge element of other folks will pass over your magnificent writing because of this problem.

  2. Hello! Do you know if they make any plugins to protect against hackers? I’m kinda paranoid about losing everything I’ve worked hard on. Any tips?

  3. F*ckin¦ amazing issues here. I¦m very glad to peer your article. Thanks a lot and i am looking ahead to touch you. Will you kindly drop me a mail?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या