गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करा राष्ट्रवादी कॉग्रेसची मागणी

गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करा राष्ट्रवादी कॉग्रेसची मागणी

सुधिर भोसले राष्ट्रवाधी: देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्याबद्दल गोपीचंद पडळकर याने केलेल्या विधाना बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पंढरपूर तालुका व शहर यांचे तर्फे पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अरूण पवार साहेब तहसीलदार कार्यालय येथे नायब तहसीलदार पिरजादे साहेब यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी तालुका अध्यक्ष दिपक पवार शहराध्यक्ष सुधीर भोसले युवकचे प्रदेश सचिव अरूण आसबे शहर उपाध्यक्ष सचिन कदम गिरीष् चाकोते सहसचिव कपिल कदम सचिन सोळंखी अनिल अंभगराव रशिद शेख सलीम मुलाणी महमद मुलाणी भाळवणी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ शिंदे व सद्दाम महिला तालुकाअध्यक्ष सौ अनिता पवार सांगिता माने व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग यांचे निकष कायम आडवे आले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याबाबत कधीच विरोधात नव्हती मात्र याबाबतच्या कायदेशीर अडथळ्यांवर माफ करण्यासाठी केंद्र सरकारचे आणि अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या निकषांचा मोठा अडथळा ठरला परंतु गोपीचंद पडळकर हे केवळ आरक्षणाच्या नावाखाली राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करून भाजपकडून पाठ थोपटून घेत आहेत  आदरणीय शरद पवार साहेबानी हि अडचण लक्षात घेऊन धनगर समाजासाठी विशेष प्रवर्गाची निर्मिती केली याचा विसर गोपीचंद पडळकर याना पडला आहे अशी टीका यावेळी करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!